health

सकाळी-सकाळी चने खाण्याचे फायदे

तुम्हाला हे माहीतच असेल की बरेचसे लोक सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी भिजलेले चने खातात. विशेष करून ते लोक जे जिम करतात किंवा सकाळी व्यायाम करतात. काय तुम्हाला माहीत आहे का हा सामान्य वाटणारा आहार घेऊन लोक दिवसाची सुरुवात का करतात. कारण यामध्ये असतात अनेक आरोग्यदायी गुण. फाईबर, विटामिन आणि खनिजे भरपूर असतात, काळे चने खरे तर तुमच्या आहारा मध्ये समाविष्ट करण्याचा एक विकल्प असू शकतो.

चने खालल्या मुळे तुम्हाला बादाम किंवा अन्य कोणत्याही ड्राई फ्रुट पेक्षा जास्त फायदा होतो. रोज सकाळी भिजलेले चने खालल्या मुळे खालील प्रमाणे आरोग्याला लाभ मिळतात.

उर्जा आणि इम्युनिटी वाढवते.

काळे चन्यामध्ये मैंगनीज भरपूर प्रमाणात असते. याच सोबत यामध्ये पोषक तत्व असतात थियामिन, मैग्निशियन आणि फोस्फोरस पण असते. मैंगनीजच्या सेवना मुळे तुमच्या शरीराला उर्जा प्राप्त होते सोबतच यामुळे इम्यूनिटी वाढते. चने खालल्यामुळे तुम्हाला व्यायाम करताना जास्त घाम येण्यास मदत करते.

मेटाबॉलिज्म वाढवते

चण्यामध्ये आयरन भरपूर असते जे तुमचे एनीमिया सारख्या समस्या पासून बचाव करते याच सोबत मेटाबॉलिज्म वाढवते. मेटाबॉलिज्म उर्जेचा स्तर बनलेला राहून देते.

महिलांच्या हार्मोनल स्तराला नियंत्रित ठेवतो

चण्यात फाईतोन्युट्रीएंटस जसे फाइटोओएस्ट्रोजेन और सेपोनिन्स असते. हे एंटी-ओक्सीडेंट्स आणि न्युट्रीएंट्स महिलांच्या शरीरामध्ये होणाऱ्या हार्मोनल बदलाला नियंत्रित ठेवतो ज्यामुळे मासिकधर्मच्या वेळी होणाऱ्या मूड स्वीगंसची समस्या कमी होते आणि मेनोपोजेच्या नंतर दिसणाऱ्या लक्षणा मधून पण आराम मिळतो.

वजन कमी करण्यास मदत

चण्यामध्ये डाइटरी फाइबरी भरपूर असते ज्यामुळे हे तुमचे वजन कमी करण्यास मदत करते. काळ्या चण्यात सोल्यूबल आणि इनसोल्यूबल फाइबर दोन्ही असतात. सोल्यूबल फाइबर तुमच्या पचन तंत्रात अन्ना सोबत एकत्र होऊन एक जैल सारखा पदार्थ बनवते जे पित्ताचे उत्सर्जन चांगल्या पद्धतीने करते. सोबतच इनसोल्यूबल फाइबर पचन शक्ती चांगली करते.

हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम

देशी चण्यामध्ये मैग्नशियम आणि फॉलेट जास्त असते जे तुमचे रक्त वाहिन्या मजबूत करते. सोबतच हे खराब कोलेस्ट्रोल कमी करते ज्यामुळे हृदय निरोगी राहते आणि हृदय रोग होण्याची शक्यता कमी होते.


Show More

Related Articles

Back to top button