dharmikhealth

नवरात्री मध्ये बूट-चप्पल न घालता चालणे आरोग्यासाठी असते चांगले, आरोग्याला मिळतात हे फायदे

नवरात्रीच्या दिवसा मध्ये सगळेच भक्तिमय झालेले असतात. या नऊ दिवसा मध्ये अनेक लोक देवीची पूजा करण्यात मग्न असतात तर काही लोक उपवास करतात. तर ज्यांचा जप तप मध्ये विश्वास आहे ते दिवसरात्र मंत्र जप करतात. इतर दिवशी मांसाहार करणारे लोक देखील शाकाहारी होतात. जे उपवास करतात ते तर कडक नियम पाळतात.

तुम्ही पाहिले असेल कि या दिवसा मध्ये अनके लोक चप्पल बूट घालणे सोडून देतात आणि अनवाणी राहतात. परंतु यासगळ्याच्या मागे जेवढा आस्थेचा भाव तेवढाच त्यामागे वैज्ञानिक बाजू देखील आहे. चला पाहू नवरात्रीच्या दिवसांमध्ये अनवाणी चालण्यामुळे काय होते.

ऋतू बदल झाल्यामुळे आरोग्यासाठी चांगले असते

नवरात्रीच्या अगोदर पावसाळा असतो जो संपतो आणि शरद ऋतू सुरु होतो. म्हणजेच यादिवसात जास्त गरम होत नाही आणि थंडी देखील वाजत नाही. हा काल जास्तीत जास्त विटामिन डी सूर्याच्या किरणांमधून घेण्याचा काळ असतो.

बैलेंस होते शरीराचे तापमान

या दरम्यान भूमी (जमीन) थोडी हलकीशी गरम असते, अनवाणी चालण्यामुळे हि उष्णता आपण शरीराला सहज देऊ शकतो. पावसाच्या दिवसात शरीरा मध्ये थंडी भरण्याची आणि कफ जमा होण्याची शक्यता जास्त असते. पायामधून शोषित झालेली उष्णता वातावरण आणि आरोग्य यांचा समतोल करते आणि शरीरातील थंडी कमी होऊन उष्मा वाढ होते.

एक्यूप्रेशर थेरेपी

अनवाणी चालण्यामुळे पायाच्या मदतीने आपली एक्यूप्रेशर थेरपी होते. अनवाणी चालण्यामुळे पायाच्या नसांच्यावर दबाव पडतो, ज्यामुळे रक्तप्रवाह वेगाने होतो. ब्लोकेज दूर होतात. शरीराचे सगळे भाग आपल्या हात आणि पायाच्या नासांसोबत जोडलेले असतात. यांना एक्यूप्रेशर प्‍वाइंट्स म्हणतात.

ज्यांच्यावर दबाव पडल्यामुळे शरीरावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. नऊ दिवस सतत अनवाणी असल्यामुळे आपल्याला एक्यूप्रेशर थेरपी मिळते ज्यामुळे शरीर दिर्घकाळ निरोगी राहते.

मांसपेशी सक्रीय होतात

अनवाणी चालल्यामुळे त्यासर्व मासपेशी सक्रीय होतात, ज्यांचा वापर चप्पल-बूट घातल्यावर होत नाही.

तणाव मुक्ती

अनवाणी चालल्यामुळे तणाव, हाईपरटेंशन, सांधेदुखी, झोप न येणे, हृदयाच्या संबंधित समस्या, ऑर्थराइटीस, अस्थमा, ऑस्टीयोपोरोसिस समस्या दूर होते आणि रोगप्रतिकार क्षमता वाढ होते.

या लोकांनी अनवाणी चालू नये

ज्यालोकाना डाइबिटीक, अर्थराइटिस, पेरिफेरल वसकुलर डिज़ीज (Peripheral vascular disease) चा त्रास असेल त्यांनी अनवाणी चालू नये. कारण यामुळे आजार वाढण्याची शक्यता असते. असे करण्याच्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.


Tags
Show More

Related Articles

Back to top button