डोकेदुखी झाली तर करा हे घरगुती उपाय

0
31

डोकेदुखी हा एक सामान्य प्रॉब्लेम आहे. डोके दुखी होण्याची अनेक कारणे असू शकतात. जसे ऊन लागणे, अपचन होणे, डोळ्यांची समस्या, अनियमित मासिक धर्म, सायनस, सर्दी, ताप, सततची चिंता, मानसिक ताण, अनिद्रा, रात्री उशिरा पर्यंत जागरण, मद्य, कडक उन्हात फिरल्याने आलेला थकवा आणि इतर अमली पदार्थांचे सेवन इत्यादी.

डोके दुखी झाल्या नंतर सतत पेन किलरचे सेवन केल्यामुळे रिएक्शन होण्याची भीती देखील नेहमीच असते. त्यामुळे जर तुम्ही देखील डोकेदुखीने त्रस्त असाल तर आराम मिळवण्यासाठी करू शकता हे घरगुती उपाय.

थोडेसे लवंग घेऊन त्यामध्ये थोडे मीठ मिक्स करून त्याची पावडर बनवून घ्यावी. ही पावडर हवा बंद डब्यात भरून ठेवावी. आपले डोके जेव्हा दुखायला लागेल तेव्हा या तयार केलेल्या पावडर मध्ये कच्च दूध मिक्स करून पेस्ट बनवा आणि ती पेस्ट डोक्यावर लावा. आपल्याला त्वरित डोके दुखी मध्ये आराम मिळेल.

एक ग्लास गरम पाण्यात लिंबाचा रस पिळून त्याचे सेवन करावे. जर डोके दुखी होण्याचे कारण गैस असेल तर त्वरित आराम मिळेल.

डोकेदुखी मध्ये आराम मिळवण्याचा अजून एक प्रभावी उपाय म्हणजे युकेलिप्टसच्या तेल लावून डोक्याची मालिश करावी.

दररोज होणाऱ्या डोकेदुखीमुळे वैतागले असाल तर रोज एक ग्लास गायीच्या दुधाचे सेवन करावे यामुळे डोकेदुखी मध्ये आराम मिळेल.

दालचिनीची पावडर करून घ्यावी.जेव्हा डोके दुखी होते तेव्हा दालचिनीची पावडर पाण्यात मिक्स करून पेस्ट बनवा. ही पेस्ट डोक्यावर लावल्यामुळे आपल्याला आराम मिळेल.

सर्दी झाल्यामुळे डोकेदुखी होत असेल तर धणेपूड आणि साखरेचा घोळ बनवून त्याचे सेवन केल्यामुळे फायदा मिळतो.

उन्हामुळे डोकेदुखी होत असेल तर चंदन पावडरची पेस्ट बनवून कपाळावर लावल्यामुळे डोकेदुखी दूर होते.

नारळाचे तेल लावून 10-15 मिनिट डोक्यावर मालिश केल्याने डोके दुखी मध्ये आराम मिळतो.

डोकेदुखी पासून आराम मिळवण्यासाठी लसणाच्या एका कळीचा ज्यूस काढून पिण्यामुळे आराम मिळतो.

सारखी डोकेदुखी होत असेल तर सफरचंदावर मीठ लावून खाल्ले पाहिजे. त्यानंतर गरम पाणी किंवा दुधाचे सेवन केले पाहिजे. आपण जर हा प्रयोग लागोपाठ 10 दिवस केला तर डोकेदुखी पासून आराम मिळेल.