Uncategorized

समस्याकाळात चाणक्य यांच्या या एका नीतीचा वापर केला तर आपल्याला समस्या जाणवणारच नाही

आचार्य चाणक्य हे तक्षशिला विश्वविद्यालयामध्ये अर्थशास्त्राचे आचार्य  होते. त्यांना कौटिल्य आणि विष्णुगुप्त या नावांनी देखील ओळखले जायचे. चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथाची रचना केली. या ग्रंथा मध्ये जीवनाला सुखी आणि यशस्वी बनवण्यासाठी अनेक नीती सांगितल्या आहेत. जर या नीतीचे पालन केले गेले तर आपण अनेक समस्यांपासून वाचू शकता. येथे जाणून घेऊया अशीच एक नीती..

आपदर्थे धनु रक्षेद् दारान् रक्षद्धनैरपि।

आत्मानं सततं रक्षेद् दारैरपि धनैरपि।।

हा चाणक्य नीती मधील पहिल्या अध्यायातील सहावा श्लोक आहे. या श्लोकामध्ये आचार्य म्हणतात कि समजदार व्यक्तीला नेहमी आपत्तीकाळा मध्ये वाचण्यासाठी धनाचा संग्रह आणि धनाची रक्षा केली पाहिजे. वाईट काळामध्ये धन सगळ्यात मोठा मदतगार होऊ शकतो. जर आपल्या जवळ धन नसेल तर समस्या अजून जास्त वाढू शकतात.

व्यक्तीने धना पेक्षाही जास्त आपल्या जीवन साथीची रक्षा केली पाहिजे. जीवनसाथीचे नेहमी आपली सोबत करतो. त्याच्याच मदतीने मोठ्यातील मोठी दूर होऊ शकते. चाणक्य पुढे म्हणतात कि व्यक्तीने धन आणि जीवनसाथी यांच्या पेक्षा जास्त स्वताचे रक्षण केले पाहिजे. जर आपल्याला काही झाले तर धन काहीच कामी येणार नाही. तसेच जीवनसाथीसाठी देखील संकट उभे राहू शकते.

चाणक्य यांनी बनवले चंद्र गुप्त मौर्य यांना अखंड भारताचे सम्राट

चाणक्य यांच्या काळामध्ये भारत वेगवेगळ्या खंड-खंड मध्ये विभाजीत झालेला होता. त्याकाळी चाणक्य यांनी आपल्या योजनांच्या मदतीने अखंड भारताचे निर्माण केले आणि चंद्रगुप्त मौर्य यांना सम्राट बनवले. चाणक्य हे मौर्य साम्राज्यामध्ये महामंत्री होते, पण ते नगराच्या बाहेर एका झोपडी मध्ये राहत असत.

चाणक्य यांच्या या नीतीचा वापर करून आपण आपल्या आपत्तीजनक काळातून सहज बाहेर पडू शकतो तसेच आपल्या जीवनसाथीसाठी देखील कोणतेही संकट येऊ नये याची काळजी घेऊ शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button