Breaking News

जर आपल्या कुंडली मध्ये पितृ दोष, तर करून पहा हे अचूक उपाय

कुंडलीमधील पितृ दोषामुळे आयुष्यात अनेक समस्या उद्भवतात. म्हणून ज्या लोकांच्या कुंडलीत पितृ दोष आहे त्यांनी त्वरित काही उपाय केले पाहिजेत. कारण वेळोच जर प्रतिबंध केला गेला नाही तर या दोषाचे गंभीर परिणाम होऊ शकतात. जर तुमच्या कुंडलीत पितृ दोष असेल तर तुम्ही पुढील उपाय केले पाहिजेत. या दोषांचे दुष्परिणाम हे उपाय करून टाळता येऊ शकतात.

कुंडली मध्ये पितृ दोष असतील तर करा हे उपाय

नारळ पाण्यात प्रवाहित केला पाहिजे

जर तुमच्या कुंडलीत पितृ दोष असेल तर हा उपाय करा. या उपायासाठी एक नारळ घ्या आणि ते आपल्या डोक्यावरून 7 वेळा उतरावा. मग तुम्ही हा नारळ नदीत प्रवाहित करा. नारळ वाहून गेल्यानंतर मागे वळून पाहू नका आणि काहीही न बोलता थेट आपल्या घरी या. हा उपाय केल्याने आपले पितृ आपल्यावर खुश होतील.

रुद्राक्ष धारण केले पाहिजे

रुद्राक्ष धारण केल्याने पितृ दोषही नष्ट होतो. पितृ दोषअसल्यास आपण अष्ट मुखी रुद्राक्ष धारण केले पाहिजे. हे रुद्राक्ष तुम्ही फक्त सोमवारी धारण करावे. रुद्राक्ष धारण केल्यावर काही काळातच त्याचा परिणाम तुम्हाला दिसून येईल आणि या दोषा पासून तुमचे रक्षण होईल.

21 मोरपंख ठेवा

ज्या लोकांच्या कुंडलीत पितृ दोष आहे त्यांनी त्यांच्या घरात मोराचे पंख ठेवावेत. घरात 21 मोरपंख ठेवणे शुभ असते आणि असे केल्याने पितृ दोषांचा जीवनावर परिणाम होत नाही आणि घरात आनंद कायम राहतो.

शिवलिंगावर जल अर्पित करा

शिवलिंगावर जल अर्पण केल्याने पितृ दोषाचा नाश होतो. म्हणून दर सोमवारी तुम्ही मंदिरात जा आणि शिवलिंगाला पाणी आणि दूध अर्पण करा आणि शक्य असल्यास तांदळाचे दाणे देखील अर्पण करा. असे केल्याने तुम्हाला पितृ दोषातून आराम मिळेल.

हनुमान चालीसा वाचावे

पितृ दोषांचा दुष्परिणाम हनुमान चालीसा वाचूनही टाळता येतो. तुम्ही प्रत्येक शनिवार मंदिरात जाऊन हनुमाना समोर बसून हनुमान चालीसाचे पठण करावे. हनुमान चालीसा व्यतिरिक्त जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही सुंदरकांड देखील वाचू शकता. पण, हे लक्षात ठेवा की आपण फक्त संध्याकाळी सुंदरकांड वाचले पाहिजे.

काळ्या श्वानास किंवा कावळ्याला पोळी देणे

काळ्या कुत्र्याला किंवा कावळ्याला भाकरी दिल्यासही हा दोष दूर होतो. म्हणूनच, आपण हा उपाय देखील करून पाहू शकता. आपण शनिवारी फक्त एका काळया कुत्रा किंवा कावळ्याला भाकरी किंवा पोळी खायला द्या. जर आपण ठेवलेली भाकर कावळा खात असेल तर आपण समजावे की लवकरच आपला दोष संपेल.

जर कुंडलीमध्ये पितृ दोष असेल तर आपण वर नमूद केलेले उपाय केलेच पाहिजेत. हे उपाय खूप प्रभावी आहेत आणि त्यांना केल्यास आपणास या दोषातून मुक्तता मिळू शकते.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.