celebritiesinspirationPeople

दोन वेळ मैगी खाऊन भूक शांत करत होता हार्दिक पांड्या, उधारच्या बॅट ने शिकला बॅटिंग

ऑल राउंडर क्रिकेटर हार्दिक पांड्या भारतीय क्रिकेट टीम चा महत्वाचा खेळाडू झाला आहे. आज ज्यास्थानी हार्दिक पोहचला आहे त्यासाठी त्याने फार मेहनत घेतली आहे. क्रिकेटसाठी हार्दिकच्या मनामध्ये एवढे वेड होते की तो दुसऱ्याच्या किट घेऊन खेळण्यासाठी जायचा आणि पूर्ण दिवसातून फक्त दोन वेळा मैग्गी खाऊन पोट भरायचा. भारतीय टीम चा भाग झालेल्या आणि एवढा चांगला खेळाडू बनण्याच्या मागील त्याच्या संघर्षा बद्दल तो सांगतो अंडर-19 च्या दौऱ्याच्या वेळी मी फक्त मैग्गी खात असे. मी मैग्गी चा चाहता आहे आणि काही परिस्थिती अशी होती की मला फक्त मैग्गीच खावी लागत होती.

हार्दिक सांगतो की आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्याला आपली डायट मैनेज करणे फार कठीण होते. आता मी जे पाहिजे ते खाऊ शकतो पण त्यावेळी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे दोन्ही वेळा दिवसा आणि रात्री मी मैग्गी खात होतो.

तसेच अंडर-16 च्या दौऱ्यावेळी परिस्थिती अजूनच बिकट होती पण मी स्वताला थांबवू शकत नव्हतो पण आता सर्व बदलले आहे. तो काळ फार सुंदर होता. मी फार भाग्यशाली आहे कारण त्या कठीण परिस्थितीने आज मला या जागी पोहचवले आहे. ही गोष्ट फार कमी लोकांना माहीत आहे की बिना कोणत्याही सेविंगच्या आम्ही एक गाडी खरेदी केली होती.

मी आणि माझा भाऊ कृणाल मैच खेळण्यासाठी गाडी मधूनच जायचो. आम्ही एक वर्षासाठी बरोडा क्रिकेट एसोसिएशन कडून क्रिकेट किट उधार घेतली होती. माझे वय त्यावेळी 17 होते आणि कृणालचे जवळजवळ 19 होते. अनेक लोक त्यावेळी प्रश्न करायचे की आम्ही गाडीने येतो जातो पण आम्ही स्वताची एक क्रिकेट किट खरेदी करण्यास समर्थ नाही आहोत.

हार्दिक पुढे म्हणाला की लोकांना काही माहीत नसते आणि ते विनाकारण प्रश्न उपस्थित करत असतात. मी आणि कृणाल मिळून ठरवले की कोणतीही परिस्थिती आली तरी कमजोर पडायचे नाही. आपल्या आणि कृणालच्या संघर्षा बद्दल बोलतान हार्दिक पुढे म्हणाला कुटुंबामध्ये फक्त वडील कमवणारे होते. आम्हा दोघा भावंडाना मैच खेळण्यासाठी दुसऱ्या गावात जावे लागत असे. कृणाल ला एका मैचचे 500 आणि मला 400 रुपये मिळत असत. हे अगदी आईपीएल खेळण्याच्या सहा महिने अगोदर पर्यंत असेच होते पण आता आमच्याकडे सर्व आहे.


Show More

Related Articles

Back to top button