राणादा वर दुःखाचे डोंगर कोसळले, सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या

कोल्हापूरच्या मातीचा रंग असलेली मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ फक्त महाराष्ट्रा पुरती मर्यादित नाही तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. या मालिकेत दाखवलेल्या कुस्तीमुळे महाराष्टातील अनेक बंद पडलेल्या तालीम पुन्हा नव्याने सुरु झाल्या आहेत हे या मालिकेचे यशच म्हणावे लागेल. रुस्तम-ए-हिंद, आणि डबल ‘महाराष्ट्र केसरी’ दादू दत्तात्रय चौगुले हे रविवारी दुपारी हृदयविकारामुळे निधन पावले.

त्यांचे वय 73 वर्ष होते. महाराष्ट्राची कुस्तीची इंटरनॅशनल पातळीवर ओळख मिळवून देण्यात दादूंचा मोठा हातभार होता. त्यांच्या अचानक निधनामुळे ‘तुझ्यात जीव रंगला’ चा राणादा देखील दुःखी झाला आहे.

सोशल मीडियावर रानादा ने एक फोटो शेयर करताना म्हंटले आहे कि, यांच्या कडून मला खूप काही शिकण्यास मिळाले. त्यांच्या अचानक जाण्या बद्दल विश्वास बसत नसल्याचे त्याने आपल्या पोस्ट मध्ये लिहले आहे.

त्यांच्या सोबतचा वज्रकेसरीचा सामना अजून आठवत आहे. त्यांनी शिकवलेल्या गोष्टी, स्पष्ट नजरेसमोर आहेत. महाराष्ट्राच्या या लाडक्या पैलवानाच्या अनेक पैलवानांना आस्मान दाखवले आहे.

त्यांच्या सोबत काम करतानाचे सगळे अनुभव डोळ्या समोर तसेच स्पष्ट दिसत आहेत असे रानादा ने लिहले आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या पैलवानाला तुझ्यात जीव रंगलांच्या पूर्ण टीम कडून भावपूर्ण आदरांजली देत असल्याचे रानादा ने लिहिले आहे.

महाराष्ट्राच्या लाडक्या रुस्तम-ए-हिंद, आणि डबल ‘महाराष्ट्र केसरी’ दादू दत्तात्रय चौगुले यांना मराठी गोल्डच्या संपूर्ण टीम कडूनही भावपूर्ण आदरांजली. आपले कर्तृत्व मोठे होते आणि महाराष्ट्र आपल्याला कधीहि विसरणार नाही. ईश्वर आपल्या आत्म्यास शांती देवो..

आपण आपल्या भावना कमेंट्सच्या आणि लाईकच्या माध्यमातून आमच्या सोबत शेयर करू शकता. आमचे लेख बद्दल अपडेट मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज मराठी गोल्ड लाईक करण्यास विसरू नका आम्ही आपल्या सोबत नेहमी आपल्यासाठी महत्वाची माहीत पोहचवत असतो.