astrology

हनुमान चालीसा वाचन करतांना लक्षात ठेवा हे नियम, नाहीतर होऊ शकते नुकसान

कलयुगा मध्ये महाबली हनुमान एकमेव असे देवता आहेत जे आपल्या सगळ्या भक्तांची मनोकामना पूर्ण करतात जे व्यक्ती मनोभावे बजरंगबलीची पूजा अर्चना करतात त्यांच्यावर महाबली हनुमान आपली कृपा नेहमी ठेवतात आणि त्यांच्या जीवनात येणाऱ्या सर्व समस्या दूर ठेवतात. असे मानले जाते कि जर हनुमान एखाद्या व्यक्तीवर प्रसन्न झाले तर त्याव्यक्तीच्या जीवनातून सगळ्या समस्या दूर होतात आणि त्याला आपल्या जीवनात भरपूर आनंद प्राप्त होतो. यासाठी लोक महाबली हनुमानाची कृपा मिळवण्यासाठी पूजा-अर्चना करतात आणि हनुमान चालीसा पठन करतात. असे मानले जाते कि हनुमान चालीसा पठन केल्यामुळे व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवना मध्ये कधीही धनाची कमी येत नाही.

मान्यते अनुसार जी व्यक्ती हनुमान चालीसा मंगळवार आणि शनिवारी नियमित पठन करतो त्यास शनीचा प्रकोप होत नाही. परंतु हनुमान चालीसा पठन करतांना काही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्याबद्दल आपण अधिक माहिती पुढे पाहू.

हनुमान चालीसा पठन करतांना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

जर आपण हनुमान चालीसा पठन करत असाल तर अंघोळ केल्या शिवाय हनुमान चालीसाचे पठन करू नये. जर आपण हा नियम पाळला नाही तर महाबली हनुमान आपल्यावर क्रोधीत होऊ शकतात आणि ज्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

हनुमान चालीसा पाठ झाल्यावर जेव्हा आपण हनुमानास नैवेद्य अर्पण करतो तो बुंदी किंवा गुळ-चने असावा.

हनुमान चालीसा पठन करण्या अगोदर महाबली हनुमान यांच्या प्रतिमेस चमेलीचे तेल आणि शेंदूर याने श्रुंगार आवश्य करावा आणि त्यांना जानवे अर्पण करावे.

जसे कि आपल्या सगळ्यांना माहित आहे महाबली हनुमान हे भगवान श्रीराम यांचे परम भक्त आहेत यासाठी असे मानले जाते कि बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी सगळ्यात पहिले भगवान श्रीराम यांचे नामस्मरण आवश्य केले पाहिजे यामुळे व्यक्तीच्या सगळ्या मनोकामना महाबली हनुमान पूर्ण करतात.

हनुमान चालीसा पठन आपण शनिवार किंवा मंगळवार पासून सुरु करू शकता आणि कमीतकमी 40 दिवस हा पाठ आवश्य केला पाहिजे.

वर दिलेल्या सर्व सूचनांचे आपण पालन केले तर महाबली हनुमान यांची कृपा आपल्यावर नेहमी राहील आणि आपल्या सगळ्या मनोकामना हनुमान जी नक्की पूर्ण करतील आणि आपल्या जीवनातील सगळे कष्ट नाश होतील आणि आपल्या घर परिवारात सुख समृद्धी टिकून राहील.


Tags
Show More

Related Articles

Back to top button