Interesting

कपड्यांना लागलेले हळदीचे डाग या पद्धतीने दूर करा

किचन मध्ये काम करत असताना बहुतेक वेळा हळदीचे डाग कपड्याना लागतात अश्यावेळी हे डाग कसे दूर करावेत हा एक मोठा प्रश्न आपल्या समोर येतो. कारण हळदीच्या डागावर डिटर्जंट पावडर किंवा साबण लावले तर ते लाल होतात. त्यामुळे ते अजून जास्त ठळक दिसतात. त्यामुळे ही समस्या कशी सोडवावी हे अनेक लोकांना माहीत नसते. परंतु आज येथे जी पद्धत आम्ही तुम्हाला सांगत आहोत त्यानंतर तुमची ही समस्या देखील दूर होईल.

चला पाहू हळदीचा डाग कपड्याना लागला तर तो कसा दूर करता येतो. याची पद्धत एकदम सोप्पी आहे आणि कपड्यावरील डाग देखील दिसेनासे होतात.

सगळ्यात पहिले हळदीचा डाग असलेला कपडा व्यवस्तीत जमिनीवर अंथरावा ज्यामुळे आपल्याला डाग काढणे सोप्पे जाईल.

आता ज्या ठिकाणी हळदीचा डाग आहे तेथे डिटर्जंट पावडर लावू हाताने व्यवस्थित सगळीकडे डिटर्जंट लावा. आपण हळदीच्या डागावर डिटर्जंट लावल्यामुळे डाग लाल दिसेल पण घाबरून जाऊ नका. पुढे आपण डाग कसा दूर करायचा हे जाणून घेत आहोतच.

आता पाण्याचा वापर करून डिटर्जंट पावडरीने डाग धुण्याचा प्रयत्न करा त्यासाठी आपण नॉर्मली कपडे जसे स्वच्छ करता ती पद्धत वापरा.

आपण नॉर्मली ज्या पद्धतीने कपडे स्वच्छ करता त्या पद्धतीचा वापर केल्याने डाग काही प्रमाणात कमी झाला असेलच. लक्षात घ्या आपल्याला कपडे सुकवाचे नाहीत कारण आता आपण यापुढची स्टेप काय आहे ती पाहू. या स्टेप मध्ये आपण फेब्रिक व्हाईटनर किंवा लिक्विड ब्लिच देखील बोलले जाते.

एका भांड्यात अर्धा छोटा चमचा फेब्रिक व्हाईट्नर घ्या त्यामध्ये दोन मोठे चमचे पाणी मिक्स करा. लक्षात ठेवा आपल्याला डायरेक्त फेब्रिक व्हाईट्नर वापरायचे नाही त्यामध्ये पाणी मिक्स करायचे आहे.

टूथब्रशला वरील तयार केलेले मिश्रण लावून त्याने डाग स्वच्छ करावा. आपण लिक्विड कपड्याला लावून ब्रशने घासाला तसतसा डाग निघून जाईल.

आता शेवटी पुन्हा नॉर्मली आपण कपड्याला धुवायचे आहे आणि सूर्यप्रकाशात वाळत घालायचे आहे. लक्षात घ्या सूर्यप्रकाशात म्हणजेच उन्हा मध्ये कपड्याला वाळत घालायचे आहे कारण सूर्यप्रकाशात कपडे वाळत घातल्याने नैसर्गिक पणे त्यावर असलेले रंग आणि डाग निघून जातात.

वाचा Interesting सगळ्यांत पहिले मराठी गोल्ड वर.

Related Articles

Back to top button
Close
Close