Hair Care

केसांना कलर करताना या चुका करणे टाळा, अन्यथा…

आजकाल हेयर कलर करणे सामान्य झाले आहे. केसांना कलर करून तुम्ही नवनवीन लूक करून पाहू शकता. हल्ली बहुतेक लोक केसांना कलर करणे पसंत करतात. पण लोक केसांना कलर करताना अजाणते पणे काही चुका करतात. अजाणते पणाने केलेल्या चुकांचा दुष्परिणाम पडू शकतो आणि केस सफेद होणे आणि केस गळणे यासारख्या समस्या होऊ शकतात. चला पाहूयात हेयर कलर करताना अजाणते पणे तुमच्या कडून कोणकोणत्या चूका होऊ शकतात.

कलर करण्याच्या अगोदर केसांना जास्त ब्लीच करणे

कलर करण्याच्या अगोदर तुम्ही ही काळजी घेतली पाहिजे की तुमचा स्टाइलिस्ट तुमच्या केसांवर किती प्रमाणात ब्लीचचा वापर करत आहे. एका ठराविक प्रमाणापेक्षा जास्त ब्लीच वापरणे तुमच्या केसांच्या गळण्याचे आणि कोरडे होण्याचे कारण होऊ शकते यासाठी जास्त प्रमाणात ब्लीचचा वापर करणे टाळावे.

कलर करण्याच्या अगोदर ड्राई-शैम्पू करणे

अनेक लोक कलर करण्याच्या अगोदर शैम्पूचा वापर करण्याच्या एवजी ड्राई-शैम्पू वापरतात जे योग्य नाही आहे. ड्राई-शैम्पू मुळे तुमची स्कैल्प 5-6 तासांच्या नंतर परत तेलकट होते यासाठी केसांवर नॉर्मल शैम्पू वापरावा हे केसातून अतिरिक्त तेल स्वच्छ करते सोबतच केसांच्या मुळा जवळ कलर जाण्यापासून वाचवते.

कैटलॉग पाहून कलर निवडणे

केसांना कलर करण्यासाठी तुम्ही अश्या कलरची निवड करता जो कैटलॉग मध्ये आकर्षक दिसतो पण कैटलॉग मध्ये कलरला जास्त आकर्षक दाखवले गेलेले असते यासाठी भ्रमात राहू नका आणि पूर्ण सावधानतेने कलर निवड करा.

बॉक्स वर दिलेल्या सूचनांच्याकडे दुर्लक्ष करणे

प्रत्येक रंग आणि ब्रांडची प्रकृती वेगवेगळी असते पण लोक बहुतेक वेळा कलर करताना सूचनांचे पालन करत नाही. यामुळे चुका होण्याची शक्यता वाढते आणि तुमचे केस खराब होऊ शकतात. यासाठी केसांना कलर करण्याच्या अगोदर बॉक्सवर दिलेल्या सूचनांचे पालन करा.

कलर केल्या नंतर प्रोटेक्शनसाठी योग्य शैम्पूची निवड न करणे

जर तुम्हाला वाटते की तुमच्या केसांचा कलर दीर्घकाळ टिकून राहावा तर कलर प्रोटेक्ट करणारे शैम्पू वापरावे. चांगल्या ब्रांडच्या कलर प्रोटेक्ट शैम्पू वापरल्यामुळे केसांचा रंग दीर्घकाळ टिकून राहतो.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : लोक हे पिण्यासाठी विदेशातून येतात पण तुम्ही नाही पीत? ही नि:शुल्क संजीवनी अनेक रोगांना मुळा सकट दूर करते.


Show More

Related Articles

Back to top button