Connect with us

5 दैनंदिन सवयी ज्या नकळत कॅन्सरचा धोका वाढवतात, ज्यांना तुम्ही टाळू शकता

Food

5 दैनंदिन सवयी ज्या नकळत कॅन्सरचा धोका वाढवतात, ज्यांना तुम्ही टाळू शकता

आपल्याला दैनंदिन आयुष्यामध्ये काही सवयी पडलेल्या असतात ज्यांचा आपल्या आरोग्यावर नकळतपणे अतिशय भयंकर परिणाम होत असतो. अश्याच काही सवयी ज्यांच्यामुळे आपल्या शरीरात कॅन्सरचा धोका वाढतो त्या कोणत्या आहेत हे आज आपण येथे पाहणार आहोत.

चहा कॉफी पिण्यासाठी वापरले जाणारे प्लॅस्टिकचे कप

कप धुण्याचा त्रास नको म्हणून अनेकदा फोम किंवा प्लॅस्टिकच्या कपातून चहा दिला जातो. मात्र ही सवय आरोग्याला त्रासदायक आहे. प्लॅस्टिकमधील बिस्फिनॉल-ए आणि डाईडथाइल हेक्सिल फैलेट हे घटक घातक आहेत.

जेवणाचे प्लॅस्टिकचे डब्बे, डिश

अनेकदा हॉटेल्समधून ऑर्डर केलेलं अन्न प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये पॅककरून दिले जातात. मात्र अनेकजण अशी कंटेनर्स घरात साठवतात. त्याचा पुन्हा पुन्हा वापर करतात. मात्र यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो.

मायक्रोव्हेव मध्ये बनवलेले आर्टिफिशिअल बटरयुक्त पॉपकॉर्न

जेरूसलममधील ल्यूटेनबर्ग सेंटर फॉर इम्यूनोलॉजी आणि कॅन्सर रिसर्चचे चेयरमॅन प्रोफेसर ईटन यफेनोफ यांनी केलेल्या दाव्यानुसार. मायक्रोव्हेवमध्ये शिजवलेले आर्टिफिशिअल बटरयुक्त पॉपकॉर्न आरोग्याला त्रासदायक आहे. यामधील विषारी घटक फुफ्फुसांच्या कॅन्सरला कारणीभूत ठरतात.

ग्रिलिंग़

ग्रिलिंग प्रक्रियेद्वारा अन्न शिजवताना त्यासाठी उच्च तापमानाचा वापर केला जातो. हे कॅन्सरला कारणीभूत ठरते. या प्रक्रियेमधील heterocyclic घटक कॅन्सरसाठी कारणीभूत ठरते. WHO च्या अहवालानुसार, रेड मीट खाणंदेखील आरोग्याला धोकादायक आहे.

तयार डब्बाबंद पदार्थ

पॅक्ड, डब्बाबंद पदार्थ आरोग्याला त्रासदायक आहे. प्लॅस्टिकच्या बॉटलमधील सॉफ्ट ड्रिंक्सदेखील आरोग्याला धोकादायक आहेत. अशा डब्यांमध्ये बिस्फेनॉल-ए (बीपीए) घटक असतात. यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top