Breaking News

सोमवार 14 डिसेंबर रोजी आहे 2020 चे शेवटचे सूर्य ग्रहण या राशी वर होणार सर्वात जास्त प्रभाव

ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. जेव्हा सूर्य चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात आणि सूर्य चंद्राच्या सावलीने व्यापलेला असतो, तेव्हा या खगोलशास्त्रीय घटनेला सूर्यग्रहण म्हणतात.

या वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण 14 डिसेंबर सोमवार 2020 रोजी आहे. अमावस्याच्या दिवशी सूर्यग्रहण आहे, म्हणून ग्रहणांचा दिवस सोमवती अमावस्या देखील आहे. ग्रहण ही ज्योतिषातील एक अतिशय महत्वाची घटना मानली जाते.

ज्योतिषाशास्त्रा नुसार, ग्रहण काळाआधी वेध लागतात. वेध काळापासून ग्रहण संपेपर्यंत काही सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. ग्रहणकाळात काय करावे आणि काय करू नये हे पाहू.

सूर्यग्रहण वेळ : 2020 वर्षातील शेवटचा सूर्यग्रहण 14 डिसेंबर रोजी संध्याकाळी 07:03 पासून सुरू होईल, मध्यरात्री नंतर 12:03 मिनिटे पर्यंत राहील. हे ग्रहण रात्री होत आहे,  हे ग्रहण भारतात दिसणार नाही. भारतात दिसणार नसल्यामुळे, हे ग्रहण पाळण्याची गरज नाही.

ग्रहण काळात हे करावे : ग्रहण होण्यापूर्वी दान देण्यासाठी वस्तू काढून ठेवल्या पाहिजेत, ग्रहण संपल्यानंतर त्या वस्तू दान करू शकता. ग्रहण वेळी कोणतीही पूजा करू नये, घराच्या मंदिराला पडदा देखील घाला. तसेच शिजवलेल्या जेवणावर तुळशीची पाने ठेवा. असे मानले जाते की यामुळे नकारात्मकता दूर होते.

असे करू नका : ग्रहण चालू असताना तुळशी कधीही तोडू नये. या वेळी देवाच्या मूर्तींना स्पर्श करण्यासही मनाई आहे. ग्रहण वेळी काहीही खाणे-पिण्यास मनाई आहे. या दरम्यान कोणी झोपू नये. वृद्ध आणि मुलांसाठी झोपेचा नियम नाही. यावेळी, मां’स आणि म’द्य कोणत्याही प्रकारे सेवन करू नये. ग्रहण काळात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी.

ग्रहणानंतर हे केले पाहिजे : जेव्हा ग्रहण संपेल तेव्हा संपूर्ण घर स्वच्छ केले पाहिजे. ग्रहणानंतर मंदिर स्वच्छ करा आणि तसेच देवपूजा आणि देवाला स्नान घालावे. स्वतः स्नान करून संपूर्ण घरात गंगाजल शिंपडावे. पिण्याचे पाणी देखील बदलले पाहिजे.

या राशीवर प्रभाव : या ग्रहणाचा सर्व राशींवर प्रभाव असतो, मेष राशीसाठी हे ग्रहण चांगले राहील. परंतु वृषभ राशीच्या आरोग्यास त्रास होऊ शकतो. त्याच वेळी, मिथुनला भागीदारीत काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

कर्क राशीच्या लोकांच्या नोकरीवर संकट येऊ शकते. सिंह राशिच्या लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कन्याच्या लोकांनी कठोर परिश्रम करा.

तूळ राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असेल. वृश्चिक राशीचा खर्च वाढू शकतो. धनु राशिला पैशांची कमतरता असेल. मकर राशीला आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

तर कुंभचे उत्पन्न आणि खर्च यांच्यात संतुलन निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. मीन राशींना कामाच्या ठिकाणी अस्वस्थता वाटेल.

About Marathi Gold Team