Breaking News

पती पत्नी मधील वाद झाल्यानंतर व्यक्ती गौतम बुद्धांचा शिष्य झाला, त्यानंतर पुढे जे झाले ते प्रत्येक व्यक्ती ने आपल्या जीवनात अवलंबले पाहिजे

गौतम बुद्ध यांच्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग आहे ज्यामध्ये लपलेल्या शिकवणीचा प्रत्यक्ष जीवनामध्ये अवलंब केल्यास अनेक समस्या पासून दूर राहता येऊ शकते. आज यातीलच एक प्रसंग आपण जाणून घेऊया ज्यामध्ये आपल्याला चांगली शिकवण मिळते.या प्रसंगाच्या अनुसार एक व्यक्तीचे वैवाहिक जीवन सुरळीत नव्हते. सतत त्याचे पत्नी सोबत वाद होत होते. एक दिवस कंटाळून तो जंगलामध्ये गेला. जंगला मध्ये त्याला महात्मा बुद्ध आपल्या शिष्याच्या सोबत दिसले. बुद्ध आपल्या शिष्याच्या सोबत त्याच जंगलामध्ये थांबले होते. दुखी व्यक्ती देखील बुद्ध आणि त्यांच्या शिष्या सोबत राहू लागला आणि त्यांचा शिष्य बनला.

काही दिवसा नंतर बुद्ध त्या व्यक्तीला म्हणाले मला तहान लागली आहे, जवळील नदीतील पाणी घेऊन ये. गुरुची आज्ञा म्हणून व्यक्ती पाणी आणण्यासाठी नदी किनारी गेला. नदीवर गेल्यावर त्याने पाहिले कि जंगली जनावरांच्या दंगामस्तीमुळे पाणी गढूळ झाले आहे. नदीमधील माती पाण्याच्या वर आल्यामुळे पाणी गढूळ झाले होते. तो व्यक्ती गढूळ पाणी पाहून पाणी न घेताच परत आला.त्या व्यक्तीने सगळी हकीकत आपल्या गुरूंना सांगितली. काही वेळा नंतर बुद्ध पुन्हा व्यक्तीला म्हणाले पाणी घेऊन ये. तो व्यक्ती पुन्हा नदीकडे निघाला. जेव्हा तो नदी किनारी पोहचला तेव्हा त्याने पाहिले कि पाणी एकदम स्वच्छ आहे. नदीमधील सगळी घाण खाली बसली होती. हे पाहून व्यक्ती आश्चर्य चकित झाला.

पाणी घेऊन तो परतला. त्याने गुरूंना विचारले कि आपल्याला कसे माहीत झाले कि आता पाणी स्वच्छ झाले असेल. बुद्ध त्याला समजावू लागले कि प्राण्यांच्या मस्तीमुळे पाणी गढूळ झाले होते. पण काही वेळा नंतर सगळे प्राणी निघून गेले तेव्हा नदीचे पाणी शांत झाले त्यानंतर पाण्यातील घाण हळूहळू खाली बसली आणि पाणी स्वच्छ झाले.बुद्ध म्हणाले जेव्हा आपल्या जीवनामध्ये समस्या येतात तेव्हा आपल्या मनामध्ये देखील असाच गढूळपणा होतो आणि शांतता भंग होते. अश्या स्थितीमध्ये आपण चुकीचा निर्णय घेतो. आपण मनातील गढूळपणा शांत होण्याची वाट पाहिली पाहिजे. संयम बाळगला पाहिजे. शांत मनाने जेव्हा आपण निर्णय घेतो तेव्हा आपण योग्य निर्णय घेतो. त्या व्यक्तीला समजले कि आपल्या हातून देखील घर सोडण्याचा निर्णय अशांत मनानेच झालेला आहे, जो चुकीचा आहे. त्यानंतर व्यक्तीने बुद्धाकडे घरी परतण्याची परवानगी मागितली आणि तो पुन्हा आपल्या पत्नीकडे गेला.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.