dharmik

गुरुवारचे व्रत केल्यामुळे होते धन प्राप्ती, भगवान विष्णू कृपेने मिळतील 5 फायदे

तसे तर आठवड्यातील प्रत्येक दिवसाचे आपले एक विशेष महत्व आहे आणि प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवी देवतेसाठी तो समर्पित आहे असे मानले जाते. व्यक्ती आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धी प्राप्त करण्यासाठी शक्य तेवढे अनेक प्रयत्न करत असतो त्याला आपल्या घर-परिवारामध्ये सुख पाहिजे असतो त्यासाठी तो आपल्या पध्द्तीने सगळे प्रयत्न करतो तरी देखील त्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जर आपल्या जीवनामध्ये देखील मेहनत करून देखील समस्या उत्पन्न होत असतील तर आपण गुरुवारच्या दिवशी व्रत करू शकता. हिंदू धर्मामध्ये गुरुवारचा दिवस विशेष मानला जातो, असे मानले जाते कि गुरुवारचा दिवस व्यक्तीच्या जीवनामध्ये समृद्धी घेऊन येतो, गुरुवारच्या दिवशी विशेषतः भगवान विष्णूची पूजा अर्चना केली जाते, जर भगवान विष्णू आपल्या पूजेने प्रसन्न झाले तर आपल्या जीवनातील धनाची कमी राहत नाही आणि आपले जीवन धन-धान्य परिपूर्ण राहते.

याच सोबत गुरुवारचा दिवस गुरु ग्रहाशी संबंधित आहे. गुरु ग्रहाला व्यक्तीच्या जीवनामध्ये धन योग बनवणारा मानले जाते. असे मानले जाते कि जर व्यक्तीने आपल्या खऱ्या भक्तिभावाने गुरुवारच्या दिवशी गुरु ग्रहांची पूजा केली आणि व्रत ठेवले तर त्या व्यक्तीवर गुरुची कृपा होते, गुरुवारचे व्रत अत्यंत सोप्पे आहे आणि पूजा विधी सरळसाधी आहे, जर आपण या सोप्प्या व्रतास केले तर आपल्या जीवनामध्ये असलेली धनाची कमी दूर होऊ शकते.

गुरुवारच्या व्रताची विधी

जर आपण गुरुवारच्या दिवशी व्रत ठेवले तर व्रत काळात भगवान विष्णूला लाडूंचा नैवेद्य द्यावा. जर आपण असे केले तर त्यामुळे भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतील. जर लाडूचा नैवेद्य देणे शक्य नसेल तर त्याऐवजी आपण साखर किंवा खडीसाखरचा नैवेद्य देऊ शकता. त्याच सोबत असे सांगितले जाते कि गुरुवारी स्नान केल्या नंतर केळ्याच्या झाडाला पाणी अर्पित केले पाहिजे, जर आपण असे केले तर भगवान बृहस्पति (गुरु ग्रह) आपल्या श्रद्धेने प्रसन्न होतील.

गुरुवारचे व्रत करण्याचे फायदे

  • जर आपण गुरुवारचे व्रत ठेवले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये धनाची कमी होत नाही आणि आपल्याला धन कमावण्याचे वेगवेगळे मार्ग प्राप्त होतात.
  • जर आपण गुरुवारचे व्रत केले तर आपल्या घरामध्ये वाद विवाद नाही होणार आणि आपल्या घरामध्ये सुख-शांतीचे वातावरण राहील.
  • असे मानले जाते कि जो व्यक्ती गुरुवारचे व्रत ठेवतो त्याच्या घरातील सगळे कौटुंबिक वाद दूर होतात.
  • जर एखाद्या व्यक्तीस नोकरी प्राप्त करण्यास समस्याच होत असतील तर अश्या स्थिती मध्ये गुरुवारचे व्रत करणे शुभ मानले जाते. जर आपण गुरुवारचे व्रत केले तर त्यामुळे नोकरी प्राप्तीचे योग निर्माण होतात.
  • जे व्यक्ती गुरुवारचे व्रत करतात त्यांच्या घरामध्ये कधीही अन्नाची कमी होत नाही.

वर दिलेल्या माहितीची सत्यता आमच्या कडून पडताळण्यात आलेली नाही तसेच वरील माहिती सत्य असल्याचा कोणाही दावा आम्ही करत नाही याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. वरील माहिती एका प्रसिद्ध वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पोस्टचा मराठी अनुवाद आपल्या मनोरंजनासाठी येथे प्रकाशित करण्यात आला आहे.

वाचकांनी वरील माहितीचा प्रत्येक्ष वापर करण्याच्या अगोदर सत्यता पडताळून घ्यावी ही विनंती. marathigold.com यापासून होणाऱ्या कोणत्याही प्रत्येक्ष आणि अप्रत्यक्ष फायद्यास किंवा नुकसानीस जबाबदार राहणार नाही.

Tags

Related Articles

Back to top button