inspiration

शिष्य म्हणाला गुरूला आपण शेतकऱ्याची मजा घेऊ, त्याची पिशवी लपवून ठेवू, पण मंग पुढे जे झाले ते थक्क करणारे होते

एक गुरु आपल्या शिष्या सोबत भ्रमण करत होते. तेव्हा त्यांनी पाहिले कि एक शेतकरी आपल्या शेता मध्ये काम करत आहे आणि शेताच्या बाहेर एका झाडा खाली त्याने जेवण आणि काही आवश्यक सामान ठेवले आहे. शिष्य आपल्या गुरूला म्हणाला गुरुजी आपण या शेतकऱ्याची थोडी मजा घेऊ, याचे सामान लपवून ठेवू.

गुरु ने शिष्याला सांगितले नाही असे नको करूस. तू त्याच्या पिशवी मध्ये जाऊन थोडे पैसे ठेवून ये. त्यानंतर पहा काय होते. शिष्याने गुरुचे बोलणे ऐकून त्याप्रमाणे शेतकऱ्याच्या पिशवी मध्ये दोनशे रुपये ठवले. त्यानंतर गुरु-शिष्य तेथेच एका झाडाच्या मागे लपून राहिले. काही वेळा नंतर शेतकरी आपल्या शेतातून बाहेर आला. त्याने आपली पिशवी उघडली तर त्यामध्ये त्याने पाहिले कि शंभर रुपयाच्या दोन नोट त्यामध्ये होत्या.

शेतकरी चकित झाला कि हे पैसे कसे आले. त्याने शेताच्या चारी बाजूला पाहिले पण तेथे कोणीही दिसले नाही. तेव्हा त्याने परमेश्वराचे आभार मानले आणि म्हणाला कि हे प्रभू आज मला आपल्या मुलांच्या औषधासाठी पैश्यांची गरज होती. या पैश्यांनी मी मुलांच्यासाठी औषधे घेऊ शकेल.

गुरु आणि शिष्य हे पाहत आणि ऐकत होते. शिष्य गुरूला बोलला कि गुरुदेव आज मी समजलो कि घेण्या पेक्षा जास्त मजा देण्या मध्ये आहे.

कथेचे सार : आपण गरजू लोकांची मदत केली पाहिजे. अशी मदत केल्यामुळेच खरी मजा आणि आनंद मिळतो. वेळोवेळी दुसऱ्याची मदत केली पाहिजे, दुसऱ्याची मदत करून घेतलेली मजा ही दुसऱ्याला त्रास देऊन घेतलेल्या मजे पेक्षा जास्त मोठी आणि आनंद देणारी असते.


Tags
Show More

Related Articles

Back to top button