Festivals Eventsviral

Gudi Padwa 2019 Wishes Marathi: गुढीपाडव्याच्या शुभेच्छा संदेश Status, Images, WhatsApp Messages, Facebook Greetings, हिंदू नववर्षांचं स्वागत

Gudi Padwa 2019 Wishes Marathi: गुढीपाडव्याच्या शुभेच्छा संदेश Status, Images, WhatsApp Messages, Facebook Greetings, हिंदू नववर्षांचं स्वागत करायचं तर हे सगळं पाहिजेच. हिंदू धर्माच्या नवीन वर्षांचा पहिला दिवस आणि पहिला सण म्हणजे गुढी पाडवा जो आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो. आजच्या हायटेक युगात आपण गुढीपाडव्याच्या शुभेच्छा (Gudi Padwa Wishes) देखील Status, Images, WhatsApp Messages, Facebook Greetings यांच्या माध्यमातून आपल्या आप्तेष्ट आणि मित्रपरिवाराला देत असतो.

यावर्षीचा गुढीपाडवा (Gudi Padwa) 6 एप्रिल रोजी आहे. या दिवशी हिंदू नववर्षारंभ होत आहे त्यामुळे आपल्यासाठी काही निवडक सुंदर गुढी पाडवा आणि नववर्ष शुभेच्छा संदेश खाली देत आहोत.

गुढी उभारून आकाशी, बांधून तोरण दाराशी, काढून रांगोळी अंगणी, हर्ष पेरुणी मनोमनी, करू सुरुवात नव वर्षांची. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...

चैत्राची सोनेरी पाहाट, नव्या स्वप्नाची नवी लाट, नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षांची हीच तर खरी सुरुवात गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...

निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुढी... नवे नवे वर्ष आले घेऊन गुळसाखरेची गोडी... गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

चैत्राची सोनेरी पाहाट, नव्या स्वप्नाची नवी लाट, नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षांची हीच तर खरी सुरुवात गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...

मिळून आपण गुढी उभारू, होऊन सारे एक सर्वीकडे पोचवू आपण, पर्यावरणाचा संदेश

श्रीखंड पुरी रेश्माची गुडी आणि लिंबाच पान तुम्हा सर्वांना नववर्ष जाओ एकदम छान

गाठींच्या माळा, लिंबाचं लेणं, समवेत नऊवारी साडी, निळ्या नभात लहरे उंचच उंच विजयाची गुढी पाडव्याच्या सणाचा असा हा अनोखा थाट, करूनिया वंदन गुढीला, या सुमुहुर्तावर चालू प्रेमाचीच वाट…!

गुढी उभारून आकाशी, बांधून तोरण दाराशी, काढून रांगोळी अंगणी हर्ष पेरूणी मनोमनी करू सुरूवात नव वर्षाची

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत रहावी… कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे आई भवानीच्या कृपेन तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे

नवीन पल्लवी वृषलतांची नवीन आशा नववर्षाची, चंद्रकोरही नवीन दिसते, नवीन घडी ही आनंदाची

तुम्हाला माहीत असेलच कि गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्ताच्या पैकी एक मुहूर्त आहे. यादिवशी तुम्ही कोणत्याही शुभ कामास प्रारंभ करू शकता त्यासाठी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नसते. अश्या या शुभ दिवशी तुम्ही नवीन उद्योगधंद्याची सुरुवात, घराची खरेदी किंवा इतर कोणतेही शुभ कार्य करू शकता. ब्रह्म पुराण हिंदू धर्माचा प्राचीन ग्रंथ आहे. यांच्या अनुसार परमपिता ब्रह्मदेव यांनी याच दिवशी सृष्टीच्या निर्माणाचे कार्य सुरु केले होते. यामुळे यास सृष्टीचा पहिला दिवस म्हणून मानले जाते.

हिंदू नववर्षाच्या या पहिल्या दिवशी आणि पहिल्याच सणाला आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो अनेक शहारा मध्ये नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येतात. तर घरामध्ये पुरणपोळीचा बेत केला जातो. आपल्या मित्रपरिवार आणि कुटुंबियांना अश्या शुभ प्रसंगी गुडी पाडवा शुभेच्छा संदेश देण्यास विसरू नका यासाठी तुम्ही वरील सुंदर आणि निवडक Gudi Padwa (गुढी पाडवा) आणि Hindu New Year (हिंदू नववर्ष) शुभेच्छा संदेश वापरू शकता.

Gudi Padwa 2019 Wishes Marathi: गुढीपाडव्याच्या शुभेच्छा संदेश Status, Images, WhatsApp Messages, Facebook Greetings, हिंदू नववर्षांचं स्वागत आवडले असतील तर आमचे फेसबुक पेज लाईक करण्यास विसरू नका आम्ही अश्याच सुंदर आणि उपयोगी माहिती आणि लेख तुमच्यासाठी दररोज घेऊन येतो. तुम्ही आमचे पेज लाईक केले नाही तर तुम्हाला आमच्या पोस्टचे अपडेट मिळणार नाहीत आणि तुम्ही महत्वपूर्ण आणि फायद्याच्या पोस्ट्स मिस कराल त्यासाठी त्वरित आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Tag: GUDI PADWA 2019, GUDI PADWA 2019 GREETINGS, GUDI PADWA 2019 IMAGES, GUDI PADWA 2019 WISHES, गुढी पाडवा, गुढी पाडवा 2019, गुढी पाडवा 2019 ग्रिटींग्स, गुढी पाडवा 2019 शुभेच्छा, गुढी पाडवा 2019 शुभेच्छापत्र, गुढी पाडवा मेसेजेस

Tags
Show More

Related Articles

Back to top button
Close