viral

Gudi Padwa 2019 : या 5 कारणामुळे हिंदू नववर्षाची सुरुवात गुढी पाडाव्या पासून होते, तुम्हाला माहीत आहे का?

हिंदू नव वर्षाचा आरंभ चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला होतो. यावेळी शनिवारी 6 एप्रिल रोजी हिंदू नववर्षाची सुरुवात होत आहे. हिंदू नववर्षाला गुडी पाडवा म्हणून आपण साजरा करतो. आपण आपल्या नवीन वर्षांची सुरुवात मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने करतो. अनेक शहरामध्ये आणि गावामध्ये नववर्ष शोभा यात्रा काढल्या जातात ज्यामध्ये लहानथोर मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. पण आपल्या पैकी असे काही लोक असतील ज्यांना कदाचित माहीत नसेल कि हिंदू नववर्षाची सुरुवात गुढी पाडव्याच्या दिवसापासूनच का केली जाते यामागे काय कारणे आहेत त्यामुळे आज येथे आपण जाणून घेऊ गुडी पाडव्या पासूनच का सुरु होते हिंदू नववर्ष याबद्दल थोडक्यात माहिती.

ब्रह्म पुराण हिंदू धर्माचा प्राचीन ग्रंथ आहे. यांच्या अनुसार परमपिता ब्रह्मदेव यांनी याच दिवशी सृष्टीच्या निर्माणाचे कार्य सुरु केले होते. यामुळे यास सृष्टीचा पहिला दिवस म्हणून मानले जाते.

Gudi Padwa 2019 Wishes Marathi: गुढीपाडव्याच्या शुभेच्छा संदेश Status, Images, WhatsApp Messages, Facebook Greetings, हिंदू नववर्षांचं स्वागत

धर्म ग्रंथा अनुसार चार युगांमधील सगळ्यात पहिल्या सत्ययुगाची सुरुवात याच तिथीला झाली होती. या दिवसा पासून सृष्टीचे कालचक्र प्रारंभ झाले होते. यास सृष्टीचा पहिला दिवस मानला जातो.

शास्त्रा अनुसार धर्मराज युधिष्ठिर याच दिवशी राजा बनले होते आणि युगाब्द (युधिष्ठिर संवत) याच तिथी पासून प्रारंभ केले होते.

माता दुर्गा उपासना पर्व चैत्र नवरात्र याच तिथी पासून सुरु होते. अशी मान्यता आहे कि वर्षाचे पहिले नऊ दिवस मातेच्या आराधनेमुळे प्राप्त शक्तीने वर्षभर जीवन शक्तीचा क्षय होत नाही.

शालिवाहन शकही याच याच तिथी पासून सुरू झाले. महर्षी दयानंद द्वारे आर्य समाजाची स्थापना देखील याच तिथीला केली गेली होती.

वरील गुढी पाडवा माहिती आणि पाच कारणे ज्यामुळे गुडी पाडव्या पासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. आता तुम्हाला कोणीही विचारले कि हिंदू नववर्षाची सुरुवात गुढी पाडव्याला का होते तर त्याचे उत्तर देण्यासाठीची माहिती तुम्हाला समजली असेलच. सगळ्यात शेवटी आमच्या कडून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंब आणि मित्रपरिवाराला गुढी पाडवा आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपण सर्व मोठ्या उत्साहात आपले हे नववर्ष प्रारंभ साजरे करणार आहोत. आमची ही पोस्ट आपल्याला आवडली असेल आणि माहिती उपयोगाची वाटली असेल तर पोस्ट शेयर करण्यास विसरू नका. तसेच आमचे फेसबुक पेज लाईक करावे जेणे करून तुम्हाला आमच्या नवीन पोस्टचे अपडेट उपलब्ध होऊ शकतील.

Tags
Show More

Related Articles

Back to top button
Close