नवरदेवाने नाकारला 4 करोड रुपयांचा हुंडा, 1 रुपया घेऊन म्हणाला तुमची मुलगीच आहे सगळ्यात मोठी संपत्ती

आपल्याला माहीत आहेच कि आता लग्नाचा हंगाम सुरु झाला आहे. सामान्य लोकांचीच नाही तर बॉलिवूड मधील लोकांची देखील मोठ्या उत्साहात विवाह होत आहेत. आजकाल बॉलिवूड मधील सेलिब्रिटींचे विवाह सोहळया बद्दलच्या बातम्या मीडियामध्ये जास्त असतात.

पण आज येथे ज्या लग्ना बद्दल सांगत आहोत ते लग्न काही वेगळेच आहे. हे लग्न हरियाणा मधील आहे जेथे हल्लीच एक असे लग्न झाले ज्याची सगळी कडे चर्चा आहे. विशेषतः नवरदेवाने लग्नाच्या अगोदर जी मागणी केली त्याबद्दल असे बोलले जाते आहे कि आता समाजाने अश्या बाबतीत गंभीरपणाने विचार केला पाहिजे. जर तुम्ही या लग्ना बद्दल जाणून घेतले तर तुम्ही देखील आश्चर्यचकित राहाल. कारण हे लग्न फक्त 1 रुपयात पूर्ण झाले आहे.

होय हे खरं आहे फक्त 1 रुपयात लग्न झाले आहे कारण यामध्ये कोणत्याही वाजंत्रीची गरज पडली नाही आणि नाही इतर खर्चाची गरज पडली. या लग्नात नवरदेव फक्त आपल्या काही नातेवाईकांच्या सोबत आला होता आणि त्याने कोणत्याही हुंडा किंवा रोख रकमे शिवाय लग्न केले. लग्ना नंतर या जोडप्याचे काही फोटो वायरल होत आहेत. ज्यानंतर यांना देश-विदेशातून शुभेच्छा मिळत आहेत.

हे लग्न हरियाणा मधील आदमपूर मध्ये झाले ज्याने सगळ्या समाजा समोर एक आदर्श ठेवला आहे. नवरदेव बलेंद्र ने लग्ना अगोदर एक अट ठेवली कि तो कोणत्याही प्रकारचा हुंडा घेणार नाही आणि कोणताही वायफळ खर्च करू इच्छित नाही. आणि एवढंच नाही तर कोणत्याही रीतिरिवाजसाठी देखील खर्च करू नये.

त्याने सांगितलं कि आपण मुलगी दिलीत एवढंच पुरेसे आहे यावर वधू कांता आणि तिचे कुटुंबीय सहमत झाले. अगोदर नवरी कडील मंडळी नवरदेवाला 4 करोड रुपये हुंडा देणार होते पण जेव्हा नवरदेवाने काही मोजक्या लोकांसोबत येऊन 1 रुपया आणि नारळ स्वीकारून कोणत्याही बैंडबाजे शिवाय शांती मध्ये लग्न केलं.

यावर स्थानिक लोकांनी प्रतिक्रिया दिली कि जर समाजातील प्रत्येक कुटुंबाने असे केले तर परिस्थिती सुधारणा येईलच पण मुलीच्या शिक्षणावर जास्त लक्ष देता येईल. बातम्यांच्या अनुसार नवरदेव चुलीखुर्द गावाचा रहिवाशी आहे. वर आणि वधू दोघेही उच्चशिक्षित आहेत. त्याने स्वताच्या गावात देखील लग्ना नंतर कोणताही देखावा केला नाही.