Uncategorized

केस काळे करण्यासाठी 50 रुपये नाही फक्त 10 रुपये लागतील या घरगुती उपायाने

केस सफेद होणे ही समस्या आता सर्वांनाच होते. अगदी तरुण वयात देखील सफेद केस काळे करण्यासाठी कृत्रिम रंगांचा वापर करावा लागत आहे. यासाठी बाजारातील महागड्या केमिकलयुक्त रंगापेक्षा घरी बनवलेला  आयुर्वेदिक पद्धतीचा हा उपाय फक्त 10 रुपायात तुमचे सफेद केस काळे करतो.

अनेक लोकांना अवेळी केस सफेद होण्याची समस्या होते तर अनेक लोकांना केस गाळण्याची समस्या असते  . पण इच्छा असून देखील ते आपले केस कायमस्वरूपी काळे आणि लांब करू शकत नाहीत. पण आज जो उपाय सांगत आहोत ज्यास वापरून आपल्या गळणाऱ्या केसांना गळण्या पासून थांबवून लांब आणि घनदाट करू शकता आणि जुन्यातील जुन्या सफेद केसांना देखील काळे करू शकता.

आज आम्ही तुम्हाला जो उपाय सांगत आहोत तो एक आयुर्वेदिक उपाय आहे. या उपायाने केस काळे होण्याच्या सोबतच लांब आणि घनदाट देखील होतात. या उपायाचा परिणाम तुम्हाला पहिल्या वेळे पासूनच दिसण्यास सुरुवात होईल.

उपाय करण्यासाठी आवश्यक सामग्री:

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त 2 वस्तूंची आवश्यकता आहे. त्या आहेत आवळा आणि दही. आवळा आपल्या केसांना मुळा पासून काळे करण्यासाठी मदत करतो आणि दही मध्य ते सर्व गुण असतात जे आपल्या केसांना गळण्या पासून थांबवण्यासाठी आवश्यक आहेत.

उपाय तयार करण्याची पद्धत:

 

हा उपाय करण्याची पद्धत देखील एकदम सोप्पी आहे. एका कढई मध्ये एक लिटर पाणी घ्या आणि त्यामध्ये 50 ग्राम आवळा पावडर टाका आणि रात्रभर तसेच भिजत ठेवा. सकाळी कढई मधील आवळा पावडर आणि पाण्यास मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवा आणि तो पर्यंत उकळू द्या जो पर्यंत कढई मधले पाणी अर्धे होत नाही. पाणी अर्धे होईल तेव्हा त्यास थंड होण्यासाठी ठेवा. थंड झाल्यावर हे पाणी एखाद्या भांड्यात काढा आणि त्यामध्ये 250 ग्राम दही मिक्स करा आणि एक पेस्ट बनवा.

पेस्ट तयार झाल्या नंतर एखाद्या ब्रशच्या मदतीने आपल्या केसांना आणि केसांच्या मुळाला लावा. हे मिश्रण केसावर 1 तास लावून ठेवा एका तासाच्या नंतर केस कोणत्याही चांगल्या हर्बल शैम्पू वापरून धुवून टाका. हा उपाय केल्यामुळे तुम्हाला पहिल्या वेळे पासूनच फरक दिसण्यास सुरुवात होईल. हा उपाय केल्यामुळे तुमचे केस काळे आणि लांब होतील. हा उपाय तुम्ही आठवड्यातून 2 वेळा करू शकता.

Related Articles

Back to top button