Connect with us

घर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई

Money

घर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई

इंटरनेटच्या येण्यामुळे घर बसल्या ऑनलाईन अर्निंग करण्याच्या संधी निर्माण झालेल्या आहेत. कोठे आपण क्लिक करून तर कोठे आपण ऑनलाईन एड पाहून काही पैसे कमावू शकतो. पण आज आम्ही तुम्हाला एक अशी संधी बद्दल सांगत आहोत ज्यामुळे तुम्ही घर बसल्या भारत सरकारसाठी काम करू शकता. भारताला डिजिटल बनवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्याच अंतर्गत सरकारने एक असे इनिशिएटिव्ह सुरु केले आहे ज्यामुळे आपण दर महिन्याला 10 हजार रुपये पर्यंत कमावू शकतो. सरकार सोबत काम करण्यासाठी  इंटरनेट आणि टाइपिंग येणे आवश्यक आहे.

चला पाहू स्टेप बाय स्टेप घर बसल्या सरकार सोबत मिळून हे काम कसे करता येईल. तसे या कामातून दर महिन्याला कसे 10 हजार रुपये पर्यंत कमावता येईल.

सरकारसाठी करावे लागेल हे काम

सरकारचा प्रयन्त आहे कि सरकारचे प्रत्येक काम डिजिटल करण्याचा त्यासाठी केंद्र सरकार अनेक वर्षांपासून पडलेल्या लाखो सरकारी फाईलला डिजिटल रूप देण्याच्या कामास लागली आहे.

आपल्याला सरकारसाठी डाटा एंट्रीचे काम करावे लागेल. यासाठी आपल्याला https://digitizeindia.gov.in/ या वेबसाईटवर स्वता रजिस्टर करावे लागेल. यानंतर आपले काम सुरु होईल.

खरंतर सरकारने लाखो सरकारी फाईल स्कैन केल्या आहेत. आता या फाईली मधील कंटेंटला डिजिटल रूप देण्यासाठी सरकार सामान्य लोकांची मदत घेत आहे आणि त्याबदल्यात त्यांना कमाई करण्याची संधी देत आहे.

रजिस्ट्रेशन प्रोसेस आणि काम कसे करावे

डिजिटाईज इंडिया च्या साईटवर गेल्यावर आपल्याला स्वता रजिस्टर करावे लागेल. यासाठी आपण भारतीय नागरिक असणे आणि आपल्याकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे.

येथे आपल्याला आपला ई-मेल आयडी, मोबाईल नंबर सह इतर डिटेल्स अपडेट करावी लागेल. या डिटेल्स नंतर आपण साइन इन करून कधीही डेटा एंट्रीचे काम करू शकता.

आपण कमाई केलेले पैसे मिळवण्यासाठी आपला बैंक अकाउंट आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे. यानंतरच आपल्या अकाउंट मध्ये पैसे क्रेडिट होतील.

हे असेल आपले काम

डिजिटाईज इंडिया वर रजिस्टर झाल्या नंतर आपल्याला टास्क करावे लागतील. यामध्ये सामान्य पाने स्निपेट्टस (शब्दांना तुकड्या मध्ये तोडले जाते) असते, जी इमेज फाईल रूपात आपल्या समोर येईल. यांना आपल्याला कॉलम मध्ये टाईप करायचे असते.

डिजीटाईज इंडिया वेबसाईट अनुसार सरकारी फाईलची गोपनीयता ठेवण्यासाठी फाईलचे कंटेंट स्निपेट्टस मध्ये तुकडे केले जातात.

टाईप करण्यासाठी आपल्या समोर एक-एक शब्द येतात, ज्यामुळे हे काम करणे सोप्पे होते. हे काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला रिवार्ड पॉईंट्स मिळतात.

रिवार्ड पॉईंट्स असे करा रिडीम

डिजीटाईज इंडिया वर डेटा एंट्री करण्यासाठी आपल्याला रिवार्ड पॉईंट्स मिळतात. हे रिवार्ड पॉईंट दोन पैश्याच्या समान असतात. 20 ते 40 वर्ड्स पर मिनिट (WPM) जर आपला टाइपिंग स्पीड आहे तर आपण दर महिन्याला 10 हजार रुपये पर्यंत कमाई करू शकतो.

रिवार्ड पॉईंट्स रिडीम करण्यासाठी आपल्या खात्यामध्ये कमीतकमी 2500 रिवार्ड पॉईंट असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त तुम्ही आपल्या बैंक अकाउंट मध्ये क्रेडिट करण्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ते सरकाराला डोनेट देखील करू शकता.

रिवार्ड पॉईंट रिडीम करण्यासाठी 2500 रिवार्ड पॉईंटची गरज असते. तर डोनेट करण्यासाठी ते कमीतकमी 1500 पॉईंट्स असणे आवश्यक आहे.

Trending

Advertisement
To Top