Connect with us

गोविंदा-कृष्णाच्या नात्या मध्ये का आला दुरावा, सुनिता आहुजा सांगतात…

Celebrities

गोविंदा-कृष्णाच्या नात्या मध्ये का आला दुरावा, सुनिता आहुजा सांगतात…

टीव्हीवर आपल्या कॉमेडी आणि डान्सने सर्वांना आपलेसे करणारा अभिनेता कृष्णा हा गोविंदाचा भाचा आहे हे सर्वांना माहित आहे. आपल्या दमदार कॉमेडी आणि डान्सच्या बळावर त्याने स्वताची ओळख निर्माण केली परंतु तरी देखील त्याची ओळख लोक आजही गोविंदाचा भाचा अशीच करतात. पण आता वैयक्तिक कारणामुळे गोविंदा आणि कृष्णा यांचे नाते संपुष्टात आले आहे. याची माहीती गोविंदाची पत्नी सुनिता आहुजा यांनी दिली आहे.

सुनिता सांगतात की कृष्णा आणि त्याची पत्नी कश्मिरा सोबतचे आमचे कौटुंबिक संबंध संपले आहेत. त्या सांगतात की, मी कृष्णा आणि गोविंदा यांच्यातील संबंधांना सुधारवण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये यश आले नाही. कारण कृष्णाचे आपल्या मामा सोबतचे वागणे चांगले नव्हते.

सुनिता यांनी पुढे खुलासा केला

कश्मिरा आणि कृष्णाच्या जुळ्या मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टी मध्ये गोविंदा दिसला नव्हता याबद्दल सुनिता सांगतात की, त्यावेळेस मी आणि गोविंदा मुंबई बाहेर होतो, आम्ही लंडनमध्ये होतो. तसेच आम्हाला पार्टीमध्ये आमंत्रित केले गेले नव्हत आणि केले असते तरी आम्ही गेलो नसतो. मी त्याच्या मुलांना कृष्णा आणि कश्मिराच्या गैरव्यवहारामुळे अजून पाहिले देखील नाही आहे. आम्ही त्यांच्या सोबतचे सर्व संबंध तोडले आहेत आणि मी शपथ घेते की, आता पुन्हा ते सुधारण्यासाठी मी प्रयत्न देखील करणार नाही. दोन वर्षापूर्वी तसा प्रयत्न मी केला होता आणि मी मूर्ख होते. गोविंदाचे कृष्णा बद्दलचे मत योग्य होते. त्यांना अजून एक संधी देण्याचा विचार मी केला हि माझी चूक होती.

यावर कृष्णाचे म्हणणे असे आहे

कृष्णाचे म्हणणे आहे की गोविंदाच्या नावामुळे मला नाव कमावणे सोप्पे झाले, असे गोविंदाचे म्हणणे आहे. त्याच्या नावाचा माझ्या करिअर मध्ये उपयोग झाला. पण जर असे असेल तर मामाचे अजूनही अनेक भाचे आणि भाच्या आहेत. परंतु एक गोष्ट मी मान्य करतो की, तरुणपणा मध्ये मला मामाने व्यक्तिगत स्तरावर भरपूर मदत केली. अगदी पैश्यांची देखील मदत केली आहे. परंतु जेव्हा प्रश्न करिअरचा येतो तेव्हा ते मी माझ्या कठोर मेहनतीने घडवले आहे. आता मला अतिशय वाईट वाटत आहे. कारण मी मामावर सदैव प्रेम केले आहे. त्यांचा मान केला आहे. मी त्यांच्या घरी 6 वर्ष राहत होतो आणि सुनिता मामींनी मला त्यांच्या मुला प्रमाणे प्रेम केले आहे. मला जाणीव आहे ते माझ्यासाठी काय आहेत आणि ते कोणी बदलू शकत नाही..

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top