Connect with us

मोदी सरकारची नवी ऑफर 25 वर्ष मोफत वीज, पहा काय आहे प्लान

Money

मोदी सरकारची नवी ऑफर 25 वर्ष मोफत वीज, पहा काय आहे प्लान

प्रदूषण, इलेक्ट्रिसिटीचं बील अशा अनेक प्रकारच्या समस्यांचं टेन्शन दूर करण्यासाठी मोदी सरकारने नवीन ऑफर भारतीयांसाठी दिली आहे. यामुळे वीजेचं बील पाहून टेन्शन घेण्यापूवी हा सल्ला नक्की वाचा.

प्लॅन काय आहे ?

केंद्र सरकारने न्यू एन्ड रिन्युएबल एनर्जी मंत्रालयाने रूफटॉप सोलर प्लान्टवर 30 % सबसिडी देण्याचं जाहीर केलं आहे. सबसिडी घेतली नाही तर सोलर पॅनल लावण्यासाठी सुमारे 1 लाख रूपयांचा खर्च येतो. पण आता केंद्र सरकारच्या मदतीने हा खर्च सुमारे 70 हजार होणार आहे. तसेच यामुळे 25 वर्ष मोफत वीज देखील मिळणार आहे. प्रत्येक राज्यामध्ये सोलर प्लान्ट लावण्याचा खर्च वेगवेगळा आहे. सबसिडीनंतर एक किलोवॉटचं सोलार प्लान्ट 60-70 हजार रूपयात इन्स्टॉल केले जाऊ शकतात. तर काही राज्यांमध्ये अतिरिक्त सबसिडीदेखील दिली जात आहे.

कोठून खरेदी करावा सोलर पॅनल ?

सोलर पॅनल विकत घेण्यासाठी राज्य सरकारच्या रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट अथॉरिटीशी संपर्क साधावा.

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये त्याच्या संबंधीत कार्यलयं आहेत.

तसेच प्रत्येक शहरात प्रायव्हेट डीलर्सकडे सोनल पॅनल आहे.

अथॉरिटीकडून कर्ज घेण्यासाठी तत्पूर्वी संपर्क साधणं गरजेचे आहे.

सबसिडीसाठी फॉर्म अथॉरिटी कार्यालयात उपलब्ध आहे.

25 वर्ष चालतं सोलर पॅनल

सोलर पॅनल सुमारे 25 वर्ष चालतं. सौर उर्जेच्या माध्यमातून तुम्हांला वीज मिळेल. हे पॅनल तुमच्या घराच्या, इमारतीच्या छतावर लावले जाते. हा प्लान्ट 1 ते 5 किलोवॉट क्षमतेचा आहे. ही वीज तुम्हांला निशुल्क उपलब्ध होणार आहे सोबतच प्रदूषणाचा धोकाही कमी होणार आहे.

500 वॉल्टपर्यंतचे सोलर पॅनल उपलब्ध

सरकारकडून पर्यावरण रक्षाणासाठी अनेक उपाय सुचवण्यात आले आहेत. गरजेनुसार, 500 वॉल्टपर्यंतचे सोलार पॅनल उपलब्ध आहेत.

10 वर्षांनी बदलावी लागते बॅटरी

सोलर पॅनलच्या मेंटनंससाठी फार खर्च नाही. दर दहा वर्षांनी बॅटरी बदलावी लागते. त्याचा खर्च सुमारे 20 हजार रूपये असतो. एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी ने – आण करणंदेखील सोयीस्कर आहे. तसेच नॅशनल बॅंकांकडून सोलार पॅनलसाठी कर्ज देण्याची सोयदेखील आहे.

कोणत्या वस्तूसाठी किती वॉल्टच्या सोलार प्लान्टची गरज

एसी – 1 किलो वॉल्ट क्षमतेच्या सोलर पॅनलवर सामान्यपणे घरातील आवश्यक सार्‍या वस्तू चालतात. एका एसी साठी दोन किलो वॉल्ट आणि दोन एसींसाठी 3 किलो वॉल्ट क्षमतेच्या सोलर पॅनलची गरज असते.

सोलार पॅनल विकू शकता

राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश, छत्तीसगड अशा राज्यांमध्ये सोलर एनर्जी विकण्याची सोय आहे. तुमच्या सोलर प्लान्टद्वारा निर्माण करण्यात आलेली वीज राज्यसरकारला विकली जाऊ शकते. उत्तर प्रदेशात याकरिता खास स्किम सुरू करण्यात आली आहे.

कसे कमवाल पैसे ?

घराच्या छतावर सोलर प्लान्ट लावून वीज बनवली जाते. हे विकून पैसेही कमावले जातात. यासाठी तुम्ही काय करू शकता ?

लोकल वीज कंपनींसोबत टायअप करून वीज विकली जाऊ शकते याकरिता तुम्हांला लायसन्स मिळते.

याकरिता वीज कंपन्यांसोबत पावर परचेस अ‍ॅग्रिमेंट करावे लागते.

सोलार प्लान्ट लावण्याकरिता प्रति किलोवॉल्टसाठी 60-80 हजार रूपयांचा खर्च आहे.

प्लान्ट लावून वीज विकण्यासाठी तुम्हांला प्रति युनिट 7.75 रूपये या दराने पैसे मिळू शकतात.

मंत्रालयाने याकरिता राज्यांना काही विशिष्ट लक्ष्य दिले आहे. त्यानुसआर सर्वाधिक लक्ष्य महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशला देण्यात आले आहे. महाराष्ट्राला 2022 पर्यंत 4700 मेगावॉटची निर्मिती करायची आहे.

Continue Reading

Trending

Advertisement
To Top