Connect with us

सावधान..! SHAREit आणि Xender लगेच डिलीट करा, हा घ्या गुगलचा सर्वात फास्ट डाटा ट्रांसफर करणारा App

Money

सावधान..! SHAREit आणि Xender लगेच डिलीट करा, हा घ्या गुगलचा सर्वात फास्ट डाटा ट्रांसफर करणारा App

SHAREit आणि Xender या एप्स बद्दल तुम्हाला माहीती असेलच हे दोन्ही एप्स डाटा ट्रान्सफर सोबत हॉटस्पॉटसाठी वापरले जातात. या दोन्ही एप्सचा दावा आहे की ते विना इंटरनेट सर्वात जास्त वेगाने डाटा ट्रान्सफर करतात. म्हणजेच वाई-फाई नेटवर्क वर एक फोनचा डाटा दुसऱ्या फोन वर वेगाने शेयर करतात. पण प्ले स्टोर वर Files Go नावाचे एक एप आहे जो या दोन्ही पेक्षा जास्त वेगाने डाटा ट्रान्सफर करतो. Files Go हे एप गुगलने बनवलेले आहे याचा अर्थ ते पूर्ण पणे सेफ आहे.

# Files Go एप का?

Files Go एप चे पूर्ण नाव Files Go by Google: Clean up space on your phone आहे.

हे तुमच्या फोन मध्ये स्पेस बनवण्या सोबत फाईल ट्रान्सफर करण्याचे काम करते.

गुगलचा दावा आहे की हे 125Mbps स्पीड ने फाईल ट्रान्सफर करते. यासाठी इंटरनेटची गरज नाही.

एंड्रॉइड गुगलची ऑपरेटिंग सिस्टम आहे ज्यामुळे एप चांगले काम करते.

एप मध्ये कोणत्याही जाहिराती येत नाहीत. ज्यामुळे तुम्ही सहज एप वापरू शकता.

# Files Go एप बद्दल

गुगलच्या या Files Go एप बद्दल अनेक लोकांना माहीती नाही.

या ऐपची साइज जवळपास 15MB आहे. या ऐपला 50 लाख लोकांनी आता पर्यंत इन्स्टॉल केले आहे.

हे एंड्रॉइडच्या वर्जन 5.0 आणि त्यावरील वर्जन मध्ये इन्स्टॉल केले जाऊ शकते.

युजर्सनी या ऐपला 5 पैकी 4.6 स्टार रेटिंग दिली आहे.

# SHAREit आणि Xender का नाही?

हल्लीच सरकारने एक आदेश दिला होता ज्यामध्ये LAC लाइन ऑफ एक्चूअल कंट्रोल वर तैनात असलेल्या जवानांना काही चीनी मोबाईल ऐप डिलीट करण्यास सांगितले होते. ऐप डिलीट करण्या सोबतच फोन रीफोर्मेट करण्याचा सल्ला दिला होता. या एडवाजरी नुसार विदेशी जासुसी एजंसी खास करून चीन आणि पाकिस्तान या ऐपचा वापर डाटा चोरी करण्यासाठी करत आहेत. या लिस्ट मध्ये SHAREit चे नाव देखील समाविष्ट होते.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top