entertenment

सोन्याचे दागिने EMI वर – काय हा चांगला पर्याय आहे?

Gold Jewellery on EMI – दिवाळीच्या निमित्ताने अनेक ज्वेलर्स आणि ऑनलाईन वेबसाईट सोन्याचे दागिने हफ्त्यावर (EMI) वर घेण्याची सुविधा देत आहे. त्यांना माहीत आहे की दिवाळी मध्ये सोने खरेदी करणे आपल्या भारतीयांची सवय आहे, परंपरा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ज्वेलर्स आणि वेबसाईट ही युक्ती करत आहेत.

आता तुम्हाला सोन्याच्या वाढणाऱ्या किमती बद्दल चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही दागिने तुमच्या आवडत्या सोनारा कडून हफ्त्यावर खरेदी करू शकता. चला पाहूया Gold Jewellery on EMI कसे मिळते.

सोन्याचे दागिने हफ्त्यावर कसे मिळतात.

दागिने हफ्त्यावर घेणे अगदी सोप्पे आहे. प्रथम, तुम्हाला तुमचा आवडता ज्वेलर निवडायचा आहे. मग तो ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोणताही निवडा.

दुसरी स्टेप आहे तुमचे EMI आणि डाउन पेमेंट निवडणे. डाउन पेमेंटची रक्कम दागिन्याचा प्रकार आणि वजना वर अवलंबून असते.

यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहीती द्यावी लागते यामध्ये तुमचा पत्ता, इनकम प्रूफ आणि PAN card ची माहीती असते. तसेच तुम्हाला लोन एग्रीमेंटवर सही करावी लागेल.

त्यानंतर कंपनी तुम्ही दिलेल्या पत्त्याचे व्हेरिफिकेशन करेल.

शेवटची स्टेप जर तुमचे लोन मंजूर झाले तर तुम्ही दागिने EMI वर खरेदी करू शकता.

EMI वर दागिने घेणे फायद्याचे राहील का?

EMI वर दागिने घेण्या अगोदर खालील मुद्दे लक्षात घ्या.

  • बहुतेक ऑफर मध्ये प्रोसेसिंग फी घेतली जाते. ही प्रोसेसिंग फी 3-4% असू शकते. याचा अर्थ तीन ते चार टक्क्याने तुम्हाला तो दागिना महागात पडत आहे.
  • कागद पत्रांची पूर्तता करावी लागेल तसेच लोन एग्रीमेंटवर सह्या कराव्या लागतील.
  • लोन मंजूर होण्यासाठी साधारणपणे 24 तास लागतात. याचा अर्थ तुम्हाला खरेदीसाठी 24 तास थांबावे लागेल.
  • तुमच्या पत्त्याची कंपनी माणूस पाठवून तपासणी करते.
  • ही ऑफर साधारणपणे 10 हजार वरील किमतीच्या दागिन्यासाठी असते.
  • हे लोन मिळवण्यासाठी तुम्हाला डाउन पेमेंट करावे लागते.
  • ही ऑफर ठराविक शहरां पुरतीच मर्यादित आहे.


Show More

Related Articles

Back to top button