Connect with us

21 व्या वर्षी घरदार सोडले बनली साध्वी, आज फक्त आवाज ऐकण्यासाठी येतात लाखो लोक

People

21 व्या वर्षी घरदार सोडले बनली साध्वी, आज फक्त आवाज ऐकण्यासाठी येतात लाखो लोक

जेव्हाही तुम्ही साधु बद्दल विचार करत असाल तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर एक वयस्कर व्यक्ती दिसते. सहसा आपण अश्याच वयस्कर लोकांना प्रवचन देताना. कमी वयाच्या साधु किंवा साध्वीला प्रवचन देतांना आपण अत्यंत कमी पाहिले असे. पण आज आम्ही तुम्हाला एका अश्या साध्वी बद्दल सांगत आहोत जिच्याबद्दलची माहीती ऐकून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. ही साध्वी वयाने अत्यंत कमी आहे. 21 वर्षाची ही साध्वी आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी कॉलेजमध्ये देखील जाते. कोण आहे ही साध्वी? काय आहे तीचे नाव, चला पाहू या.

21 वर्षांची ही साध्वी राजस्थान मध्ये राहणारी “जया किशोरी धार” आहे. 21 वर्षाच्या या साध्वीने लोकांच्यावर आपली खास छाप सोडली आहे. या साध्वीचे प्रवचन ऐकण्यासाठी दूरदूरचे लोक जमा होतात. इंदौर मध्ये लवकरच यांचे प्रवचन होणार आहे त्यामध्ये लाखो लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आवश्यक व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी मध्ये हा सत्संग होणार आहे. हा सत्संग 9 ते 12 फेब्रुवारी दरम्यान चालणार आहे. या भव्य सत्संगसाठी जवळपास तीन लाख वर्ग फुटाचा मंडप टाकण्यात आला आहे. उपलब्ध माहीती अनुसार इंदौर मध्ये जया किशोरी यांचे हे पहिले सत्संग आहे.

तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की फक्त 10 वर्षाच्या वयातच जया किशोरी यांनी आपले मन श्रीकृष्ण भगवानांना दिले आहे. घरामध्ये भक्तीचे वातावरण असल्यामुळे त्यांचा कल हा भगवान श्री कृष्णाच्याकडे वाढत गेला. जया यांनी आपला पहिला सुंदरकांड पाठ 10 वर्षाच्या वयात केला होता. त्यांचा सुमधुर आवाज लोकांना आपल्याकडे आकर्षित करतो. त्यांच्या आवाजाची जादू अशी काही चालली की त्यांचा आवाज ऐकण्यासाठी लोक दूर-दूर वरून येतात.

जया किशोरी यांनी भक्ती सोबतच आपले शिक्षण सुरु ठेवले आहे. देवाच्या भक्तीचा परिणाम ते आपल्या शिक्षणावर होऊ देत नाही. कोलकाताच्या महादेव बिरला वर्ल्ड अकादमी मधून जया यांनी आपली स्कूलिंग केली आहे. सध्या जया भावनीपूर गुजराती सोसायटी मधून आपले पुढील शिक्षण पूर्ण करत आहे. लहानपणा पासूनच जया भगवान श्रीकृष्ण भक्ती मध्ये तल्लीन असल्याने लोक तिला राधा या नावाने संबोधतात. इंदौर मध्ये होणाऱ्या या प्रवचनाचे लाइव्ह टेलिकास्ट संस्कार चैनल वर होणार आहे.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : आठवी नापास मुलाच्या इशाऱ्यावर चालते सीबीआई !

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top