People

लग्नात मिळालेल्या गिफ्टचा स्फोट, पतीचा उपचारादरम्यान मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी

लग्नात दिलेल्या भेटवस्तूचा स्फोट होऊन ओडिशामधल्या नवविवाहित तरुणाचा मृत्यू झाला तर त्याची पत्नी गंभीररित्या जखमी झाली आहे. या स्फोटात तरुणाच्या आजीचादेखील उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सौम्य साहू असं या तरुणाचं नाव होतं. गेल्याच आठवड्यात त्याचा रिमा नावाच्या तरुणीशी विवाह झाला होता. लग्नात आलेल्या भेटवस्तू उघडून पाहत असताना त्यातल्या एका भेटवस्तूचा स्फोट झाला.

यावेळी सौम्य, त्याची पत्नी रिमा आणि आजी गंभीर जखमी झाले आहेत. या तिघांनाही तातडीनं जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं पण उपचारादरम्यान सौम्य आणि त्याच्या आजीचा जागीच मृत्यू झाला तर रिमावर अजूनही उपचार सुरू आहे.

सौम्य हा सॉफ्टवेअर इंजिनिअर होता.  लग्नात आलेल्या भेटवस्तू हे दोघंही उघडून पाहत होते यावेळी सौम्यच्या ८० वर्षांच्या आजीही त्यांच्यासोबत होत्या. यावेळी आहेरात आलेल्या एका वस्तूचा तीव्र स्फोट झाला.

पतीच्या निधनामुळे रिमा अजूनही धक्क्यात आहे. स्फोटामुळे ती ४० टक्के भाजली आहे. तिच्या शरीराच्या डाव्या बाजूलाही गंभीर दुखापत झाली आहे आहेत तसेच डाव्या कानाच्या श्रवण श्रमतेवरही याचा परिणाम झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. रिमाच्या आईवडिलांनाही याचा जबरदस्त धक्क बसल्याचं रिमाच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे.


Show More

Related Articles

Back to top button