Connect with us

घरातून त्वरित बाहेर फेका या वस्तू अन्यथा वर्षभर राहील पैश्यांची कमी

Dharmik

घरातून त्वरित बाहेर फेका या वस्तू अन्यथा वर्षभर राहील पैश्यांची कमी

दिवाळीच्या वेळी सगळ्याच घरामध्ये साफसफाई जोरदार केली जाते. प्रत्येकाला आपले घर स्वच्छ आणि चमकदार पाहिजे असते कारण माता लक्ष्मीला अंधार आणि अस्वच्छता आवडत नाही. ज्या घरामध्ये स्वच्छता आणि दिव्यांचा झगमगाट असतो त्याघरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करते असे मानले जाते. त्यामुळे प्रत्येकाला आपले घर सुंदर आणि स्वच्छ पाहिजे असते.

पण घराची सफाई करताना नेहमी आपण काही वस्तू स्वच्छ करून पुन्हा वापरण्यासाठी ठेवतो परंतु त्या वस्तूंमुळे घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करतात. खरतर दिवाळीच्या दिवसात घरामध्ये कोणतीही तुटलेली फुटलेली वस्तू असू नये जी तुमच्या कोणत्याही कामाची नाही. या मुळे माता लक्ष्मी क्रोधीत होऊ शकते.

या वस्तू घरातून त्वरित बाहेर फेकून द्या

दिवाळीच्या सफाई नंतर खाली दिलेल्या वस्तू आपल्या घरामध्ये ठेवू नका त्यांना त्वरित घराच्या बाहेर फेकून द्या. असे केल्यामुळे माता लक्ष्मीची कृपा होईल आणि नकारात्मक शक्ती दूर होईल.

फुटलेली काच

दिवाळीच्या साफसफाई नंतर घरामध्ये फुटलेली काच घराच्या बाहेर त्वरित फेकून द्या कारण यामुळे घरातील सदस्यांमध्ये मानसिक तणाव राहतो आणि कोणतेही शुभ कार्य यशस्वी होऊ शकत नाही.

खराब घड्याळ

तसे तर खराब घड्याळ कधीही आपल्या घरामध्ये ठेवू नये पण दिवाळी मध्ये सफाई करताना यास फेकून दिलेच पाहिजे. घरामध्ये खराब घड्याळ असल्यामुळे घरातील सदस्यांना यश मिळत नाही आणि घराचे वातावरण खराब राहते.

मोडलेला पलंग

कोणत्याही घरामध्ये मोडलेला पलंग असल्यामुळे वैवाहिक जीवनात समस्या घेऊन येतो. याच सोबत पती पत्नी मध्ये सतत भांडण होतात. त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये जर मोडलेला पलंग असेल तर त्यास त्वरित घराच्या बाहेर काढा. यामुळे घरात शांतीचे वातावरण होईल.

तुटलेले फोटो

घरामध्ये कोणतीही मोडलेली वस्तू नसावी यामुळे घरातील नात्यांमध्ये दुरावा येतो. कारण यामुळे वास्तूदोष निर्माण होतो. याच सोबत घरामध्ये असे फोटो असतील जे फुटलेले किंवा तुटलेले असतील तर घरामध्ये नकारात्मक शक्तींचा वास होतो.

जुने दिवे

जर तुम्ही यावर्षी दिवाळीमध्ये जुने दिवे वापरण्याचा विचार करत असाल तर त्यांना त्वरित फेकून द्या कारण जुने दिवे लावल्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज होईल.

मोडलेला दरवाजा

जर तुमच्या घराचा दरवाजा मोडलेला असेल तर तो त्वरित बदलून टाका. कारण घरामध्ये अश्या प्रकारचा दरवाजा असल्याने घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करते, ज्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

वरील गोष्टींच्या व्यतिरिक्त घरामध्ये जुने खेळणी, मोडलेल्या मुर्त्या आणि वस्तू किंवा भंगार असल्यास त्वरित त्यांना घरा बाहेरचा रस्ता दाखवा, अन्यथा या दिवाळीत तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Continue Reading

Trending

Advertisement
To Top