घराच्या अंगणामध्ये आवश्य ठेवा या 5 वस्तू, राहील देवी देवतांची कृपा, दूर होतील कष्ट

घराचे आंगण हे घराचा आरसा असते असे बोललं जात. ज्या घराचे आंगण सुंदर असते ते घर देखील आतून सुंदर असेल असा अंदाज केला जातो. घराच्या अंगणामध्ये अनेक वेळा आपण एकत्र बसून गप्पागोष्टी करतो. याजागी बसून काही महत्वाचे निर्णय देखील घेतले जातात. तसेच बाहेरील लोकांचे देखील अंगणामध्ये येणे जाणे सुरूच असते. त्यामुळे आपण आपल्या घराचे आंगण पवित्र आणि पॉजिटीव्ह ठेवावे असे आपल्याला देखील वाटत असेल. त्यासाठी यामध्ये काही खास वस्तू ठेवणे आवश्यक आहे. असे केल्यामुळे देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला नेहमी मिळतात. एवढंच नाही आपल्या जीवनातील सगळे कष्ट दूर होतात. जर आपल्या घराला आंगण नसेल तर आपण या वस्तू घराच्या बाल्कनी किंवा छतावर देखील ठेवू शकता. चला तर पाहू कोणत्या वस्तू ठेवण्याच काय महत्व आहे.

तुळशीचे रोपटे

तुळशी हिंदू धर्मामध्ये देवीचे रूप मानले गेले आहे. तिला श्रीकृष्णाच्या पत्नीचा दर्जा प्राप्त आहे. असे मानले जाते कि घरामध्ये तुळशीचे असणे शुभ असते. तुळशी पॉजिटीव्ह एनर्जीचा मोठा सोर्स आहे. यास घरामध्ये ठेवण्याची सर्वोत्तम जागा आंगण आहे. जर आंगण नसेल तर आपण यास बाल्कनी किंवा छतावर ठेवू शकता. तुळशी आंगणा मध्ये ठेवल्याने आपल्या घरामध्ये वाईट आणि नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाहीत.

दीपक (दिवा)

दीपक म्हणजे दिवा आपण नेहमी पूजापाठ करताना लावतो. परंतु यास आपण संध्याकाळच्या वेळी घराच्या आंगणा मध्ये देखील लावू शकतो. दिव्यातून निघणारा प्रकाश निगेटिव्ह एनर्जीचा नाश करते. याच सोबत घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते. कुटुंबामध्ये वादविवाद होत नाहीत. हे लोकांचे माइंड पॉजिटीव्ह ठेवण्याचं काम करते. यास आपण वाटल्यास तुळशीच्या जवळ देखील लावू शकता.

अगरबत्ती

अगरबत्ती मधून निघणार धूर वातावरण शुद्ध आणि सकारात्मक करण्याचे कार्य करते. यास घराच्या आंगणा मध्ये किंवा तुळशी जवळ लावल्याने निगेटिव्ह गोष्टी आपल्या घरा पासून दूर राहतात. परंतु जर आपल्याला श्वसनाचा त्रास आहे किंवा आरोग्य विषयक समस्या उत्पन्न होत असतील तर आपण अगरबत्तीचा वापर नाही केला तरी चालू शकते. हे एक पर्यायी वस्तू आहे कारण दिवा देखील हेच कार्य करते.

लिंबू मिर्ची

लिंबू मिर्चीचा वापर अनेक वर्षा पासून वाईट नजरे पासून वाचण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे जर आपण हे घराच्या आंगणा मध्ये लावलं तर आपल्या कुटुंबाचे कोणीही वाईट करू नाही शकणार. यामुळे आपण आपल्या शत्रू पासून सुरक्षित राहता. तसेच भूत प्रेत इत्यादी आपल्या घराच्या आसपास भटकत नाहीत.

स्वास्तिक आणि ओम

स्वास्तिक आणि ओम यांना पवित्र चिन्ह मानले जाते. यास आपण आंगणाच्या भिंतीवर किंवा दरवाजावर बनवू शकता. वाटल्यास तुळशी वृंदावन किंवा कुंडीवर देखील आपण हे चिन्ह बनवू शकता. हे आपल्यासाठी चांगल्या भाग्याचे काम करेल. यास घराच्या आंगणा मध्ये बनवल्याने कामा मध्ये अडचणी येत नाहीत.