या पद्धतीचा वापर केल्याने काही मिनिटात येईल शांत झोप, आर्मी वाले वापरतात ही पद्धत

0
199

चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप आवश्यक असते. परंतु टेन्शन, धावपळ किना इतर कारणामुळे काही लोकांना रात्री सहजासहजी झोप येत नाही. ते बेड वर तर जाऊन पडतात पण झोप येण्यासाठी अनेक तास वाट पाहावी लागते. आज आपण 2 मिनिटामध्ये चांगली झोप येण्यासाठीचा एक चांगला उपाय जाणून घेणार आहोत.

हा उपाय अमेरिकेच्या सेने ने लावला आहे. खरंतर दुसऱ्या विश्व युद्ध काळात अमेरिकेच्या फाइटर पायलट्सना झोप येत नसे अश्यातच अमेरिकेच्या नेवी प्री-फ्लाइट स्कुल मधील एका वैज्ञानिक ने दोन मिनिटामध्ये झोप येण्याची पद्धत शोधून काढली. या पद्धतीचा वापर सामान्य लोक देखील करू शकतात. याची थोडी प्रैक्टिस केल्या नंतर आपल्याला देखील 2 मिनिटामध्ये झोप येऊ शकते.

या पद्धती मध्ये पायलट्स ला खुर्ची मध्ये बसल्या बसल्या झोपण्याची कला शिकवली गेली होती. यामध्ये आपली कंबर सरळ, दोन्ही पाय जमिनीवर आणि दोन्ही हातांना आराम देत जांघेवर असले पाहिजे. तसे आपण हि पद्धत बेड वर झोपूनही ट्राय करू शकतो.

या पद्धतीची मुख्य ट्रिक ही आहे कि आपल्याला आपले डोळे बंद करून आपले पूर्ण लक्ष चेहऱ्यावर केंद्रित करायचे असते. या दरम्यान आपल्याला हळू पण दीर्घ श्वास घ्यायचा असतो. श्वास जेव्हा बाहेर सोडतो तेव्हा गालांना काय वाटत ते फिल करा. याच सोबत तोंड, जीभ आणि जबडा सैल सोडला पाहिजे. डोळ्यांना देखील रिलैक्स होऊ द्यावे आणि त्यांना खोलवर फील करा. हे सगळं केल्याने आपली बॉडीला हे संकेत देईल कि आता वेळ रिलैक्स करण्याची आहे.

याच सोबत आपल्याला आपले खांदे सैल सोडत गळ्याच्या मागील बाजूस आराम द्यायचा आहे. आपल्या हातांना ढिल्ले सोडावे आणि आपले लक्ष उजव्या हातावर केंद्रित करावे. आपला उजवा बायसेप सैल करावा. डाव्या हातात देखील हेच करावे. आता आपल्या बोटांना रिलैक्स करणे सुरु करावे.

पायांचे बोलायचे झाले तर त्यांचा सगळा भार जमिनीला घेऊ द्या. पहिले उजव्या पायाची जांघ, काफ आणि बोटे रिलैक्स करा नंतर डावा पायाला देखील तसेच करा. यानंतर चेहरा ते पाय सगळ्या मसल्स रिलैक्स पोजिशन मध्ये घेऊन जावे.

मनात कोणत्याही प्रकारचा तणाव ठेवू नका. एकदम शांत राहा. मना मध्ये दिवसभरात झालेल्या गोष्टींचा विचार करू नका किंवा येणाऱ्या दिवसाचे प्लानिंग करू नका. कोणताही विचार करू नका. फक्त फील करा आपल्या चारी बाजूला काळोख आहे. एकूणच आपल्या डोळ्यासमोर आणि मेंदू मध्ये देखील काहीच ठेवू नका.

जर आपण खुर्ची वर बसले असाल तर ते देखील विसरा आणि बेड वर झोपल्या सारखे रिलैक्स व्हा. जर आपण ही पद्धत काही दिवस प्रैक्टिस केली तर आपल्याला फक्त दोन मिनिटात थंड आणि शांत झोप येईल.

दररोज आपल्याला कमीत कमी 8 तास रात्री झोप घेणे उत्तम असते. असे केल्याने आपल्या शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्थितीला चांगले असते. जर आपल्याला रात्री लवकर झोप येत नसेल आणि सकाळी लवकर उठावे लागत असेल तर या पद्धतीने आपल्याला लवकर झोप येण्यामुळे आपला वेळ वाचू शकतो.