health

2 रुपयामध्ये घरातच काढू शकता दातांची कीड, पहा कसे

दातांची काळजी घेतली पाहिजे हे आपण सर्व मानतो आणि त्यासाठी आपण प्रयत्न सुध्दा करतो. सकाळ संध्याकाळ चांगल्या टूथपेस्टने दात स्वच्छ करतो इत्यादी. पण तरीही कधी कधी एवढे करून दातांना कीड लागतेच आणि त्यानंतर जर दात दुखायला लागल्यावर ज्या वेदना होतात त्या असह्य असतात. हे तुम्ही स्वता अनुभवले असेल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला तरी अनुभवताना पाहिले असेल. यावर उपाय मग आपल्याकडे डेंटिस्तकडे जाण्यावाचून दुसरा पर्याय नसतो. डेंटिस्त तुम्हाला दात काढण्याचा सल्ला देतो किंवा रूटकॅनल करण्याचा महागडा सल्ला देतो. पण आज आम्ही तुम्हाला केवळ 2 रुपयात दातांची किड कशी काढता येईल हे सांगत आहोत.

दातांची कीड काढण्यासाठी येथे जो घरगुती उपाय तुम्हाला सांगत आहोत तो तुम्हाला एक किंवा दोन वेळा वापरल्यावरच दातांची कीड बाहेर काढेल. ज्यामुळे तुम्ही दातांच्या वेदने पासून सुटका मिळवू शकता. हे औषध बनवण्यासाठी तुम्हाला एक चिमुटभर खायचा चुना आणि एक चिमुटभर तुरटी (फिटकी) ची पावडर लागेल. चुना आणि तुरटी पावडर एक एक चिमटीभर घेऊन त्यामध्ये एक थेंब पाणी घालून पेस्ट तयार करा.

आता तयार झालेली पेस्ट कापसाच्या मदतीने कीड लागलेल्या दातावर आणि जेथे कीड दिसत आहे तेथे व्यवस्थित लावा, भरपूर लावा. यानंतर तुम्हाला आपले तोंड उघडे ठेवायचे आहे ज्यामुळे तुमचा विरुध्द बाजूचा दात पेस्ट लावलेल्या दातांना लागणार नाही.

तसेच पेस्ट लावलेल्या भागाला तुमची जीभपण लागणार नाही. तोंड उघडे ठेवल्यामुळे थोड्यावेळात लाळ गळायला लागेल ज्यामधून दातांची कीड वाहून जाईल. ही क्रिया केल्याने पहिल्या दिवशी कीड निघाली नाही तर दुसऱ्या दिवशी नक्की निघून जाईल. पण लक्षात ठेवा पेस्ट दातांना व्यवस्थित लावा आणि तोंड उघडे ठेवा.


Show More

Related Articles

2 Comments

    1. तुम्ही Blogger.com वर फ्री मध्ये ब्लॉग सुरु करू शकता किंवा होस्टिंग आणि डोमेन खरेदी करून स्वताची वेबसाईट (ब्लॉग) सुरु करू शकता. यासाठी तुम्हाला होस्टिंगवर वर्डप्रेस इंस्तोल करावे लागेल.

      जर तुम्हाला टेक्निकल नॉलेज नसेल तर सुरुवात blogger वरून केल्यास उत्तम.

Back to top button