health

मुळव्याध म्हणजे पाइल्स पासून वाचायचे असेल तर ते का होते याचे कारण तुम्हाला माहीत हवे

मुळव्याध या आजाराला मेडिकल भाषेमध्ये हेमरॉइडस या नावाने ओळखले जाते. ही एक अशी स्थिती आहे ज्यामुळे ऐनस च्या आतील आणि बाहेरील क्षेत्र आणि रेक्टमच्या खालील भागाच्या शिरांना सूज येते.

यामुळेच ऐनसच्या आतील आणि बाहेरील किंवा कोणत्याही एक जागी कोम सारखी स्थिती बनते, जे कधी आत राहते तर कधी बाहेर येते. जवळपास 70 टक्के लोकांना जीवनामध्ये कधीना कधी पाइल्सची समस्या झालेली असते. वाढत्या वयासोबत पाइल्सची समस्या वाढत जाते. जर तुमच्या कुटुंबात कोणाला ही समस्या असेल तर तुम्हाला पण अनुवांशिकते मुळे ही समस्या होण्याची शक्यता जास्त असते.

पाइल्स मध्ये मलद्वार जवळ रक्ताच्या शिरा फुगतात. हेमोरॉयडल रक्त शिरा गुद आणि रेक्टमच्या खाली असते. हेमोरॉयडल रक्तशिरांमध्ये सूज आल्यामुळे जेव्हा फुगते तेव्हा मल बाहेर पडण्यास त्रास होतो. हेमोरॉयडल रक्तशिरांची भिंत एवढी ताणली जाते की मल निघताना वेदना होतात आणि मलद्वार मध्ये खाज सुटते.

कोम आलेले रुग्णांना वेदना, जखम, खाज, जळजळ, सूज आणि गरमी यांची समस्या होते. बाळंत होताना स्त्री जेव्हा बाळाला जन्म देताना जास्त जोर लावते तेव्हा तिला पण रक्त मुळव्याध होण्याची शक्यता असते. या आजाराने ग्रस्त बहुतेक रुग्णांना बद्धकोष्ठताचा त्रास असतो. पाइल्स मुळे रुग्णाला मलत्याग करताना अत्यंत जास्त वेदना होतात आणि कोमातून रक्त वाहते. हा एक गंभीर आजार आहे कारण यामध्ये वेदना तर होतातच सोबत शरीरातील रक्त सुध्दा विनाकारण वाहून वाया जाते.

पाइल्स होण्याची कारणे

पाइल्स होण्याचे मुख्य कारण दीर्घकाळ कठोर बद्धकोष्ठता राहणे.

सकाळ-संध्याकाळ शौचास न जाने किंवा पोट साफ न होणे.

शौचाला गेल्यावर जोर लावल्यामुळे.

टॉयलेट मध्ये जास्त वेळ बसल्याने.

अनुवांशिक कारणामुळे.

डायरिया ची समस्या

अन्न मध्ये पोषक तत्वांच्या कमी मुळे.

जास्त तळलेले किंवा मसालेदार भोजन केल्यामुळे.

जास्त औषधांचे सेवन केल्यामुळे

ओवरवेट होण्यामुळे देखील पाइल्स होऊ शकतो.

जास्त दिवस हृदय आणि लीवरच्या संबंधीत आजार होण्यामुळे देखील पाइल्स होऊ शकतो.

वरील सर्व कारणामुळे पाइल्स म्हणजेच मुळव्याध होऊ शकतो. मुळव्याध पासून वाचण्यासाठी ही कारणे तुम्हाला फायदेशीर होतील. पण जर तुम्हाला मुळव्याध झाला तर खालील लिंक वर मुळव्याध दूर करण्याचे घरगुती उपाय दिले आहेत.

मुळव्याध उपायमुळव्याध पासून 1 दिवसात आराम देणारा आणि 3 दिवसात ठीक करणारा रामबाण उपाय

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : 5 घरगुती उपाय मुळव्याधचा आजार संपवण्यासाठी, पहा कोणते उपाय कसे करायचे


Show More

Related Articles

Back to top button