money

हरवलेला मोबाईल शोधण्यासाठी ही युक्ती मदत करेल

लोकांचा कल जास्तीत जास्त स्मार्ट आणि महागडा मोबाईल आपल्या हाता मध्ये असावा असा असतो. कारण मोबाईल हा एक स्टेटस सिम्बॉल झालेला आहे. पण महागडे मोबाईल घेताना अनेकांच्या मनात काळजी असते की मोबाईल हरवला तर मोठे नुकसान होईल.

मोबाईल नेहमी चोरीलाच जातो असे नाही तर काही वेळा तो आपण एखाद्या ठिकाणी ठेवून विसरतो. त्यामुळे मोबाईल आपल्या हातून निघून जातो. अश्यावेळी पश्चाताप करणे आणि पोलिसात तक्रार करणे या दोनच गोष्टी आपल्याकडे शिल्लक राहतात.

परंतु यावर एक मार्ग आहे. तो म्हणजे काही वेबसाईट आपल्याला मोबाईल ट्रॅक करण्यासाठी मदत करतात. त्यांची मदत घेऊन मोबाईल शोधण्याचा प्रयत्न करणे. यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर आपल्या मोबाईलचा आईएमईआई क्रमांक लागतो. त्यामुळे मोबाईल हरवण्याच्या अगोदर आपल्या मोबाईलचा आईएमईआई क्रमांक सुरक्षित एखाद्या कागदावर लिहून ठेवा. आईएमईआई क्रमांक पाहण्यासाठी मोबाईल मध्ये #06# करा.

मोबाईल हरवला असल्यास तो शोधण्यासाठी या वेबसाईट्स मदत करतात

  • www.bhartiyamobile.com
  • www.microlmts.net
  • www.trackimei.com
  • www.in.blackberry.com
  • www.lookout.com

 

फोन आणि गुगल अकाऊंट सिंक करावे

जर तुमचा एन्ड्रॉईड किंवा आयफोन हरवला तर काही युक्त्या आहेत ज्या तुम्हाला मदत करू शकतात. एन्ड्रॉईड मध्ये एक बिल्ड ट्रॅकर असतो. त्यामुळे इतर अ‍ॅप डाऊनलोड करण्याची शक्यता नसते. यासाठी ADM ऑन करावे लागते. असे केल्याने गुगल अकाऊंट बरोबर तुमचा फोन लिंक होतो.

ट्रॅक माय फोन फीचर वापरणे

जर तुमचा फोन हरवला असेल तर तुम्ही ट्रॅक माय फोन फीचरचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला प्ले स्टोर मधून अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. यामध्ये आपला जीमेल आयडी वापरून तुम्ही फोन सिंक करू शकता.

 

ही खास युक्ती करून ठेवा

प्रत्येक मोबाईल मध्ये प्रत्येक मोबाईलचा एक वेगळा आईएमईआई क्रमांक असतो.

आपल्या फोनवर #06# डायल करून तुम्ही हा आईएमइआई क्रमांक पाहू शकता.

हा नंबर तुम्ही एखाद्या सुरक्षित ठिकाणी लिहून ठेवा (मोबाईल मध्ये नाही). मोबाईल हरवल्यास हा नंबर तुम्हाला मदत करेल.

आईएमईआई नंबरच्या मदतीने तुम्ही आपला मोबाईल ट्रॅक करू शकता.


Show More

Related Articles

Back to top button