People

पेट्रोलचे वाढलेले भाव कमी करणे जर्मनीच्या लोकांकडून शिकावे, सरकारला कमी करावेच लागले भाव

जशी आपल्या देशामध्ये पेट्रोल आणि डीजेलची किंमत गगनाला भिडली आहे. अगदी तशीच परिस्थिती जर्मनी मध्ये झाली होती. तेव्हा तेथील लोक सरकारच्या निर्णयाची वाट पाहत नाही बसले. त्यांनी विरोध करण्याची अशी पद्धत निवडली कि रातोरात सरकारला वाढलेली किमत मागे घ्यावी लागली.

लोक रस्त्यावरच सोडून गेले आपली वाहने

हा प्रसंग साल 2000 मधील आहे, जेव्हा जर्मनी सह युरोप मधील अनेक देशा मध्ये पेट्रोल आणि डीजेलच्या वाढलेल्या किमती बद्दल लोकांच्या मनात क्रोध भावना होती. परिणामस्वरूप लोक याच्या विरुध्द रस्त्यावर उतरले.

येथील लोकांनी रस्त्यावरच आपल्या गाड्या सोडून दिल्या आणि कामावर निघून गेले.

दूर वरील भागातून आली ग्रामीण भागातून 250 ट्रक ड्रायव्हर, शेतकरी आणि टैक्सी ड्रायव्हर देशाची राजधानी बर्लिन मध्ये आले. त्यांनी आपल्या गाड्या सिटी सेंटर वर रस्त्यातच सोडून दिल्या.

त्यामुळे 5 किमी पर्यंत गाड्यांची रांग उभी राहिली. अनेक तास परिस्थिती अशीच राहिली आणि चारीबाजुला गोंधळाचे वातावरण झाले. सगळीकडे रस्त्यावर जाम लागले होते.

येथील लेइपजिंग सिटी मध्ये रोड नेटवर्कला गाड्यांनी ब्लॉक करण्यासाठी जवळपास 300 शेतकरी आले.

ट्रक ड्रायव्हर लोकांनी बर्लिनच्या बाहेरचा मेन रस्ता ब्लॉक केला, ज्यामुळे अनेक किमी लांबीचा ट्राफिक जाम झाला. तर, बेल्जियमच्या बॉर्डरवर असलेल्या दोन कार फैक्ट्रीज मध्ये यामुळे काम ठप्प झाले.

जनतेच्या या विरोधामुळे सरकारवर दबाव वाढला आणि विरोधी पक्षाने किंमत मागे घेण्याची मागणी केली आणि शेवटी मजबुरी मध्ये नाईलाजास्तव सरकारला इंधनावर असलेले टैक्स मागे घ्यावे लागले.


Show More

Related Articles

Back to top button