celebritiesPeople

एका आईडियाने लहानपणी गोबर गोळा करणाऱ्याला 8 महिन्यात 8 करोडच्या कंपनीचा मालक बनवले, वाचा काय आहे ही आईडिया

एक सामान्य भारतीय व्यक्ती आठ महिन्यात आठ करोड स्वताच्या मेहनतीने कमवतो. यावर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही तुम्हाला वाटेल की याने एखादी लॉटरी जिंकली असेल किंवा बेकायदा काम केले असेल. पण असे नाही तर त्याने मेहनतीने आणि त्याला सुचलेल्या एका आईडीयाने कमवले आहेत. चला पाहुत कोणती आहे ती आईडिया.

आम्ही तुम्हाला सांगत आहोत कैलेप्सो नावाच्या एका ब्युटी स्टार्टअप (बिजनेस) सुरु करणाऱ्या गौरव राणा बद्दल. हरियाणातील एका छोट्या गावामध्ये जन्म झालेला गौरव एक गरीब कुटुंबातील होता. त्याच्या गावात शाळा नसल्यामुळे तो शेजारील गावात शिकण्यासाठी जात होता. आपले शाळेतील शिक्षण पूर्ण केल्यावर पुढील शिक्षणासाठी त्याने शहरात जाण्याचा निर्णय केला.

पण गौरव पुढे सर्वात मोठी समस्या पैश्यांची होती. आपल्या संघर्षाच्या काळातील दिवसांच्या बद्दल गौरव सांगतो की आमची परिस्थिती फार दयनीय होती आणि वडिलांच्या आजारपणा नंतर तर आर्थिक संकट अजून वाढले. आजी एक छोटे किराणा दुकान चालवायची त्यावरच आमचे घर कसेबसे चालत होते.

पण जर तुमचे आत्मबल मजबूत असेल आणि दृढ इच्छाशक्ती असेल तर तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. गौरव सोबत असेच झाले. आपल्या कठीण मेहनतीने गौरवने आगऱ्याच्या एका एजुकेशनल इंस्टिट्यूट मध्ये प्रवेश घेतला आणि पूर्ण मेहनतीने अभ्यास सुरु केला. यादरम्यान काही गाववाल्यांनी आणि नातेवाइकांनी आर्थिक मदत केली. यशस्वी ऑटोमोबाइल इंजिनियरींगची डिग्री पूर्ण केल्या नंतर साल 2011 मध्ये गौरव नोकरीच्या शोधात इंदौरला गेला.

याच दरम्यान गौरवच्या वडिलांचे निधन झाले आणि घराची पूर्ण जबाबदारी गौरव वर आली. या करा किंवा मरा या स्थितीत गौरव ने नोकरी सोबत एक स्टार्टअप सुरु करण्याचा निर्णय घेतला. गौरवने आपला पहिला स्टार्टअप एक इवेन्ट कंपनीच्या रुपात सुरु केला पण दुर्दैवाने कंपनी चालली नाही आणि अश्या प्रकारे त्याला अपयशाची चव घेता आली.

आपल्या अपयशा मधून शिकून गौरवने एकवेळा पुन्हा साल 2015 मध्ये नवीन आईडिया आणि नवीन उत्साहाने ब्युटी सर्विस प्रोवायडर म्हणून एक स्टार्टअप सुरु केला. गौरवने आपल्या या नवीन स्टार्टअपचे नाव कैलेप्सो असे ठेवले. वेबसाईट आणि मोबाईल एप च्या मदतीने ऑन डिमांड ब्युटी सर्विस देण्याची ही आयडिया अत्यंत यशस्वी ठरली.

या एप च्या मदतीने महिला घर बसल्या ब्युटी सर्विस घेऊ शकतात. देशातील सर्वात मोठी हॉटेल साखळी असलेल्या ओयोरूम्स ने कैलेप्सो सोबत टाई-अप करून देशात वेगवेगळ्या शहरात हॉटेल मध्ये ब्युटी सर्विस देण्याचा करार केला आहे.

जो मुलगा काही पैस्यांसाठी गावातील गल्लीगल्लीत गोबर गोळा करत असे, तो आज आपल्या स्वताच्या मेहनतीच्या बळावर करोडो रुपये किमतीच्या कंपनीचा मालक झाला आहे आणि हजारो लोकांना रोजगार देत आहे.


Show More

Related Articles

Back to top button