People

घरगुती वापराचा सिलेंडर ? रुपयाने स्वस्त झाला, नागरिकांना मिळाला दिलासा

दररोज येणाऱ्या महागाईच्या बातम्यांमध्ये एक दिलासादायक बातमी आली आहे.  पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती सिलेंडरच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बिना सबसिडीवाला सिलेंडर आणि 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरमध्ये जास्त दिलासा देण्यात आला आहे.

1 मे पासून बिना सबसिडीचा सिलेंडर दिल्लीमध्ये 650.50 रुपये, कोलकातामध्ये 674 रुपये, मुंबईमध्ये 623 रुपये आणि चेन्नईमध्ये 663 रुपये झाला आहे. दिल्लीमध्ये सिलेंडर 3 रुपयांनी कमी झाला आहे. कोलकाता आणि मुंबईमध्ये 2-2 रुपयांनी किंमती कमी झाल्या आहेत. बिना सबसिडीचा सिलेंडरच्या किंमती कमी झाल्याने 1 कोटीपेक्षा अधिक लोकांना फायदा होणार आहे. कारण इतक्या लोकांनी सबसिडी सोडली आहे.

5 महिन्यांपासून सरकारकडून बिना सबसिडीच्या सिलेंडरचे भाव कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. 5 महिन्यामध्ये दिल्लीमध्ये बिना सबसिडीचा सिलेंडर 96.50 रुपये, कोलकातामध्ये 92 रुपये, मुंबईमध्ये 96 रुपये आणि चेन्नईमध्ये 93 रुपयांनी स्वस्त झाला आहे. 19 किलोचा कमर्शियल सिलेंडर दिल्लीमध्ये 1167.50 रुपये, कोलकातामध्ये 1212 रुपये, मुंबईमध्ये 1119 रुपये आमि चेन्नईमध्ये 1256 रुपये झाला आहे. एप्रिलमध्ये दिल्लीमध्ये याचा भाव 1176 रुपये, कोलकातामध्ये 1220.50 रुपये, मुंबईमध्ये 1128 रुपये आणि चेन्नईमध्ये 1264.50 रुपये होता.

सबसिडीच्या सिलेंडरच्या किंमतीमध्ये जास्त घट झालेली नाही. दिल्लीमध्ये याचा भाव 491.21 रुपये, कोलकातामध्ये 494.23 रुपये, मुंबईमध्ये 488.94 रुपये आणि चेन्नईमध्ये 479.42 रुपये झाला आहे.

तुम्हाला ही दर कपात पुरेशी वाटते का? तुम्हाला सिलेंडरचे दर किती असावेत असे वाटते कमेंट्स मध्ये आपल्या प्रतिकिया लिहा.


Show More

Related Articles

Back to top button