Connect with us

गरुड पुराण अनुसार, या 10 लोकांच्या घरी चुकूनही करू नये भोजन

Astrology

गरुड पुराण अनुसार, या 10 लोकांच्या घरी चुकूनही करू नये भोजन

हिंदी मध्ये एक जुनी म्हण आहे, ‘जैसे खाओ अन्न वैसा होगा मन’ म्हणजे तुम्ही जसे अन्न ग्रहण करता, तसे तुमचे विचार होतात. याचे सर्वात मोठे उदाहरण महाभारत मध्ये आहे, जेव्हा अर्जुनाच्या बाणांमुळे भीष्म पितामह जखमी होतात आणि बाणांच्या शैय्येवर पडलेले असतात आणि द्रोपदी त्यांना विचारते, “तुम्ही सभे मध्ये माझ्या चीरहरणाचा विरोध का केला नाही, तुम्ही तर कुळामध्ये सर्वात मोठे आणि सर्वात सशक्त होते.” तेव्हा भीष्म पितामह म्हणाले, त्यावेळी मी अधर्मी कौरवांचे अन्न ग्रहण करत होतो त्यामुळे माझे विचार देखील त्यांच्या सारखे दुषित झाले होते आणि मला ते करत असलेल्या कृत्या मध्ये काहीही चुकीचे दिसत नव्हते.” खरतर व्यक्ती ज्याचे अन्न ग्रहण करतो त्याच्या विचारांचा प्रभाव अन्न ग्रहण करणाऱ्यावर होतो आणि परिणाम स्वरूप त्याला उचित-अनुचित फळ त्याला मिळतात.

यासाठी विचारपूर्वक कोणाचेही अन्न ग्रहण केले पाहिजे. याबाबतीत गरुड पुराणात आचार कांड आपले मार्गदर्शन करतो आणि सांगतो की आपल्याला कोणाचे अन्न ग्रहण केले पाहिजे. खरतर गरुड पुराण अनुसार आपल्याला 10 प्रकारच्या लोकांच्या घरी चुकूनही भोजन नाही केले पाहिजे.

गरुड पुराण अनुसार कधी हि चोर किंवा अपराधी लोकांच्या घरचे भोजन नाही करावे. कारण त्यांचे भोजन ग्रहण केल्यामुळे तुम्ही देखील त्यांच्या पापांचे भागीदार होता आणि त्यांच्या पापांचा परिणाम तुमच्या जीवनावर देखील होतो.

तसेच गरुड पुराण अनुसार चारित्र्यहीन स्त्री म्हणजेच जी आपल्या स्वेच्छाने पूर्ण पणे अधार्मिक आचरण करते अश्या स्त्रीच्या हातचे भोजन करणे मनाई आहे. गरुड पुराण अनुसार जी व्यक्ती अश्या स्त्रीच्या हातचे भोजन करते ती व्यक्ती त्या स्त्री द्वारे केले गेलेल्या कृत्यांचे फळ भोगते.

तसेच जे लोक दुसऱ्यांच्या मजबूरीचा फायदा घेत कर्ज देऊन अनुचित रूपाने अत्याधिक व्याज घेतात, गरुड पुराण अनुसार अश्या घराचे भोजन करू नये. खरतर धार्मिक दृष्टीने पाहीले तर गैरपद्धतीने कमवलेले धन अशुभ असते, त्यामुळे या धनाचे अन्न ग्रहण करणे हितकारी असू शकत नाही.

तसेच एखादा व्यक्ती संसर्गजन्य रोगाने ग्रस्त आहे गरुड पुराण अनुसार त्याच्या घरी देखील भोजन करू नये कारण अश्या व्यक्तीच्या घराचे भोजन ग्रहण केल्यामुळे तुम्ही देखील आजारी पडू शकता. हे वैज्ञानिक दृष्टिने देखील सिद्ध झाले आहे.

तसेच क्रोधी व्यक्तीच्या घराचे देखील भोजन ग्रहण करण्यास मनाई केली आहे, क्रोध व्यक्तीचा विवेक हिसकावून घेतो आणि हे व्यक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्यामुळे जर एखाद्या क्रोधीत स्वभावाच्या व्यक्तीच्या घरी भोजन करत राहिल्यामुळे त्याच्या प्रभावामुळे तुमच्या मध्ये देखील क्रोध गुण येऊ शकतात. जे आपल्यासाठी अत्यंत हानिकारक आहे.

गरुड पुराण अनुसार किन्नर लोकांना दान देणे अत्यंत पुण्यात्मक काम आहे. पण त्यांच्या घरी भोजन करणे अनिष्टकारी होऊ शकते. खरतर किन्नर अनेक प्रकारच्या लोकांकडून दान म्हणून धन प्राप्त करत असतात, या दान करणाऱ्या लोकांमध्ये काही चांगले-वाईट लोक असतात, त्यामुळे अश्या प्रकारे कमवलेले धन शुभ नसते आणि त्यामुळे याचे अन्न ग्रहण करणे योग्य नाही.

तसेच एखादा व्यक्ती निर्दयी आणि दृष्ट प्रवृत्तीचा आहे तर त्याच्या घरी चुकूनही भोजन करू नये. कारण अश्या लोकांच्या प्रभावामुळे आपला स्वभाव देखील तसा होऊ शकतो.

गरुड पुराण अनुसार जर राजा निर्दयी आहे आणि प्रजेला कष्ट देतो तर त्याच्याकडे देखील भोजन करू नये. कारण राजाचा धर्म आहे प्रजेची काळजी घेणे आणि असे न करून तो अधर्म करत आहे, त्यामुळे त्याचे भोजन करू नये.

शास्त्रानुसार चुगली करणे वाईट आहे. असे व्यक्ती दुसऱ्यांच्या समस्येत स्वता आनंद घेतात. त्यामुळे या कामास पाप म्हंटले आहे. यामुळे अश्या लोकांच्या घरी भोजन करू नये.

नशा करणे पाप मानले जाते, त्यामुळे जे लोक नशेच्या वस्तूंचा व्यापार करतात, गरुड पुराण अनुसार त्यांच्या घरी भोजन करणे वर्जित आहे.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top