astrology

ज्या घरामध्ये हे 5 काम होतात, तेथे पैसे नाही टिकत आणि येते गरिबी

काही लोक भरपूर मेहनत करतात आणि भरपूर पैसे कमावतात पण तरीही त्यांनचे पैसे वाचत नाहीत. त्यांना नेहमी पैश्यांची कमी जाणवते. जेव्हापण पैश्यांची आवश्यकता असते तेव्हा त्यांचे खिसे रिकामे असतात. त्यामुळे नेहमी त्यांना गरिबीमध्ये दिवस घालवावे लागतात. गरुड पुराणात सांगितले गेले आहे की कोणत्या घरावर लक्ष्मी देवी कृपा करत नाही, कोणते काम देवी लक्ष्मीला आवडत नाहीत. चला पाहू असे कोणकोणते कामे आहे जे लक्ष्मी मातेस पसंत नाहीत.

घरामध्ये या वस्तू ठेवू नये

जर तुम्हाला वाटते की घरामध्ये नेहमी सुख-समृद्धी असावी आणि कोणताही वादविवाद नसावा तर घरातील नको असलेले सामान, अडगळीचे सामान घराबाहेर काढा. निरुपयोगी वस्तू जसे विना टाळ्याच्या चाव्या, गंज चढलेले खिळे, खराब लाकडे इत्यादी वस्तू जे तुमच्या काही कामाची नाहीत त्यांना त्वरित घराबाहेर फेकून द्या. अन्यथा वातावरण नकारात्मक राहील आणि देवी-देवतांची कृपा प्राप्त होणार नाही.

घरामध्ये स्वच्छता ठेवा.

नियमित पणे घराची स्वच्छता करा घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ करा. स्वच्छता नसेल तर घरामध्ये नकारात्मक उर्जा वाढते, ज्यामुळे तेथे राहणाऱ्या लोकांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. सफाई करण्यासोबतच घरातील वातावरण सुगंधित ठेवावे. यासाठी सुगंधित अगरबत्ती वापराव्यात.

अश्या अंथरुणावर झोपू नये.

पती-पत्नीचे संबंध आणि घरामध्ये सर्वकाही व्यवस्थित राहावे यासाठी आवश्यक आहे की पलंग एकदम स्वच्छ असावा. अंथरूण फाटके-मळलेले नसावे आणि पलंग देखील तुटका नसावा. पलंगाच्या यागोष्टी पती-पत्नीच्या संबंधाला प्रभावित करतात. पती-पत्नी मधील ताळमेळ कमी होतो ज्यामुळे वाद-विवाद वाढतो.

कंजूसी करू नका

शास्त्रात सांगितले गेले आहे की जर एखादा व्यक्ती धन कमवतो, पण कंजूसी केल्यामुळे दान करत नाही तर तो कधीही सुखी होऊ शकत नाही. सर्व प्रकारच्या समस्ये पासून मुक्ती मिळवण्याचे सर्वात चांगला उपाय म्हणजे दानधर्म करणे. गरिबांना दान करत रहा. गायीला हिरवा चारा आणि कुत्र्यांना पोळी द्यावी. सर्वा पहिल्या पोळी मधील काही भाग कुत्रा, कावळा आणि गाय यांना थोडेथोडे द्यावे.

रात्री खरकटी भांडी तसेच ठेवू नये.

रात्री यागोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे की घरामध्ये खरकटी भांडी तसेच ठेवू नये. त्याना व्यवस्थित स्वच्छ करून घ्यावीत. सोबतच रात्री मळलेले कपडे भिजवून झोपू नये. यागोष्टीकडे लक्ष दिल्याने कुटुंबात एकता बनून राहते.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : जर तुम्ही पण पैसे दान देत असाल तर लक्षात ठेवा यागोष्टी, अन्यथा नाही होणार फायदा


Show More

Related Articles

Back to top button