dharmik

हे 5 काम करणारे लोक कधीही नाही बनू शकत श्रीमंत, नेहमी राहते पैश्यांची कमी

प्रत्येक व्यक्तीला मोठे बनायचे असते आणि भरपूर पैसे कमवायचे असतात. प्रत्येकाला वाटते कि त्याच्या जवळ एवढे पैसे असावे कि त्याने तो आपल्या आणि आपल्या कुटुंबियाच्या सगळ्या गरजा पूर्ण करू शकेल. पण कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी मेहनत आवश्यक असते. असे अत्यंत कमी लोक असतात ज्यांना मेहनत केली नाही तरी त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. अश्या लोकांचे नशीब त्यांना चांगली साथ देते. पण प्रत्येकाच्या सोबत असे होतेच असे नाही.

समाजा मध्ये एक श्रीमंत आणि यशस्वी व्यक्ती बनण्यासाठी कठोर मेहनत करावी लागते. तुम्ही कोणालाही कधीही बिना मेहनत करता श्रीमंत होताना पाहिले आहे का? कदाचित, नसेल पाहिले कारण असे कधी होत नसते. तुम्ही मोठ्या आणि अनुभवी लोकांना नेहमी बोलताना ऐकले असेल कि मेहनती शिवाय फळ मिळत नाही. त्यांचे मानणे आहे कि व्यक्तीला त्याच्या कर्माच्या अनुसार चांगले फळ मिळतात. परंतु अनेक वेळा कठोर मेहनत करून देखील त्याप्रमाणात यश मिळत नाही. कितीही मेहनत केली तरी शेवटी अपयश येते. कधीकधी नकळत माणसाच्या हातून काही चुका होतात ज्यांच्यामुळे त्यास आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो. आज आपण येथे 5 अश्या गोष्टी पाहू ज्या नकळत आपण करतो आणि त्यामुळे आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.

संध्याकाळी झाडू मारणे

शास्त्रांच्या अनुसार कधीही संध्याकाळी झाडू मारू नये. संध्याकाळी घरामध्ये झाडू मारल्यामुळे माता लक्ष्मीचा अपमान होतो. अश्या घरा मध्ये माता लक्ष्मी राहणे पसंत करत नाही आणि घरामध्ये नेहमी पैश्यांची कमी राहते. यासाठी संध्याकाळी घरामध्ये झाडू मारणे बंद केले पाहिजे. आपल्या घरातील आर्थिक समस्यांचे हे देखील एक कारण असू शकते.

घाण हातांनी तुळशीला स्पर्श करणे

जवळपास प्रत्येक हिंदू घरा मध्ये तुळशीचे झाड असते. हिंदू धर्मामध्ये याचे महत्व आहे. यासाठी कधीही तुळशीला घाणेरड्या हातांनी स्पर्श करू नये. याच सोबत कधीही याची पाने तोडली नाही पाहिजेत. जर असे केले तर लक्ष्मी नाराज होते आणि पैश्यांच्या समस्या होतात.

गुरुवारी नखे कापणे

शास्त्राच्या अनुसार गुरुवारी नखे कापणे अशुभ मानले जाते. यासाठी चुकूनही आपल्या हात आणि पायांची नखे गुरुवारी कापू नये. असे केल्यामुळे माता लक्ष्मी दुखी होऊ शकते आणि आपले जीवन गरिबी मध्ये जाऊ शकते.

रात्री शेविंग करणे

रात्रीच्या वेळी कधीही शेविंग करू नये. याच सोबत गुरुवार आणि शनिवारच्या दिवशी शेविंग करू नये. यास अपशकून मानले जाते. असे केल्यास नेहमी पैश्यांच्या समस्या राहू शकतात.

स्त्रीचा अपमान

हिंदू धर्मामध्ये स्त्री लक्ष्मी स्वरूप मानली जाते. त्यामुळे ज्या घरामध्ये स्त्रीचा अपमान होतो तिचा मारहाण होते, शिव्या दिल्या जातात अश्या घरामध्ये माता लक्ष्मी आपला वास करत नाही. अश्या घरातील सुख शांती आणि समृद्धी पूर्णतः निघून जाते.

Tags
Show More

Related Articles

One Comment

Back to top button
Close