या कारणामुळे घरामध्ये थांबत नाही पैसा, जाणून घ्या काय म्हणतात वास्तुशास्त्राचे नियम

पैश्यांच्या समस्येने लोक नेहमी चिंतीत राहतात. चांगले उत्पन्न असून देखील त्यांची सेविंग होत नाही. अश्यात वास्तुशास्त्राचे काही नियम आपल्या उपयोगी पडू शकतात. ज्यांचा अवलंब केल्याने संबंधित समस्यांपासून सुटका मिळू शकते.

वास्तु शास्त्र अनुसार तिजोरीची तुलना धन कुबेर सोबत केली गेली आहे. यासाठी घरा मध्ये तिजोरी ठेवताना योग्य दिशेची माहिती मिळवली पाहिजे. तिजोरी उत्तर दिशेला ठेवणे शुभ मानले जाते.

वास्तु शास्त्रानुसार तिजोरी रिकामी नाही ठेवली पाहिजे. या मध्ये नेहमी काही ना काही धन आवश्य ठेवले पाहिजे. यामुळे आपल्या घरा मध्ये कधीही पैश्यांची कमी होणार नाही.

तिजोरी वर कधीही काहीही वजन ठेवू नये. असे केल्याने धनहानी होते. नेहमी आपल्यावर कर्जाचे डोंगर राहते.

घरामध्ये कुबेर यंत्राची स्थापना करावी. कुबेर यंत्राची नियमित पणे पूजा करावी. यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही वस्तूची कमी होणार नाही.