Astrology
3 में रोजी करा हि पूजा, बंद पडलेली सर्व कामे मार्गी लागतील
प्रथम पूज्य श्री गणेश हे मंगल मूर्ती आहेत सर्व देवांमध्ये त्यांची पहिली पूजा केली जाते. पंचतत्वामध्ये श्रीगणेशाला जलाचे स्थान दिले गेले आहे. गणपतीचे पूजन केल्याशिवाय कोणतीही पूजा संपन्न होत नाही. भगवान श्रीगणेश सुखदाता आहे. प्रत्येक महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी आपल्या जीवनातील संकटे समस्या दूर करणारी आहे. त्यादिवशी केलेले व्रत फलदायी ठरते.
संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्व विघ्ने दूर करते. या महिन्याला 3 मे रोजी संकष्टी चतुर्थी आहे. चला पाहूया संकष्ट चतुर्थीचे व्रत कसे करावे.
भगवान श्री गणेशाचे भक्त संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपवास करतात. गणपती बाप्पा बुद्धि दाता आहेत. सर्व विघ्ने दूर करणारे आहेत. यासाठी असे मानले जाते की संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यामुळे जीवनातील सगळी विघ्न दूर होतात.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास ठेवावा. सकाळी स्नान कार्य करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी. या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान केल्यास विशेष लाभ होतो. श्रीगणेशाची पूजा करण्याच्या वेळी पूर्व किंवा उत्तर दिशेला आपले मुख करावे. स्वच्छ आसनावर बसवून गणेशाची पूजा करावी. विधिवत पद्धतीने भगवान गणेशाची पूजा केली पाहिजे. पूजेच्या वेळी धूप दीप इत्यादी वापरून गणेशाची पूजा करावी. भगवान श्री गणेशाला तिळापासून बनलेले पदार्थ आवडतात. तिळगुळाचे लाडू किंवा मोदक यांचा नैवेद्य भगवान श्री गणेशाला द्यावा. सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीस नमस्कार असे म्हणून नैवेद्य अर्पण करावा.
संध्याकाळी संकष्टी चतुर्थीच्या व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी. त्यानंतर श्रीगणेशाची आरती करावी. विधिवत पद्धतीने गणपतीची पूजा करावी. यानंतर श्री गणेशाय नमः किंवा ओम गं गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. जर कोणी या दिवशी ओम गं गणपतये नमः या मंत्राचा जप केल्यास निश्चितच त्याला त्याच्या सर्व कार्यांमध्ये यश प्राप्ती होते.
