शाओमीच्या उप-ब्रँड Redmi ने दोन महिन्यांपूर्वीच Redmi Turbo 4 बाजारात सादर केला होता. हा स्मार्टफोन 16GB RAM आणि 6,550mAh बॅटरीसह आला होता. आता नवीन लीकमध्ये कंपनी त्याच्या ‘प्रो’ मॉडेल Redmi Turbo 4 Pro वर काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. या नवीन स्मार्टफोनच्या संभाव्य स्पेसिफिकेशन्सबद्दल सविस्तर जाणून घ्या.
Redmi Turbo 4 Pro स्पेसिफिकेशन्स
Redmi Turbo 4 Pro हा एक हाय-एंड स्मार्टफोन असेल, ज्यामध्ये Qualcomm Snapdragon 8s Elite प्रोसेसर दिला जाण्याची शक्यता आहे. हा चिपसेट अजून अधिकृतपणे बाजारात आलेला नाही, परंतु Qualcomm हा प्रोसेसर Snapdragon 8 Elite च्या डाउनग्रेड वर्जन म्हणून लॉन्च करू शकते. त्यामुळे या प्रोसेसरसह येणारे स्मार्टफोन्स साधारण ₹40,000 किंमत असलेल्या अपर मिड-रेंज सेगमेंटमध्ये असण्याची शक्यता आहे.
Redmi Turbo 4 Pro ची सर्वात मोठी खासियत त्याची दमदार 7,550mAh बॅटरी असणार आहे. आतापर्यंत कोणत्याही Redmi स्मार्टफोनमध्ये इतकी मोठी बॅटरी देण्यात आलेली नाही. यासोबत 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील दिला जाऊ शकतो.
लीक्सनुसार, Redmi Turbo 4 Pro मध्ये 6.8-इंच OLED डिस्प्ले असणार आहे, जो 1.5K रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करेल. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सह येण्याची शक्यता आहे.
Redmi Turbo 4 Pro मध्ये IP68 + IP69 रेटिंग दिली जाणार असून, यामुळे तो पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहू शकतो. मात्र, हा स्मार्टफोन नेमका कधी आणि कोणत्या स्पेसिफिकेशन्ससह भारतात लॉन्च होईल, याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.
Redmi Turbo 4 स्पेसिफिकेशन्स
Redmi ने जानेवारी 2025 मध्ये चीनमध्ये Redmi Turbo 4 लॉन्च केला होता. हा MediaTek Dimensity 8400-Ultra चिपसेटवर काम करणारा जगातील पहिला स्मार्टफोन आहे. चीनमध्ये 12GB RAM + 256GB Storage व्हेरिएंटची किंमत 1,999 युआन (अंदाजे ₹23,490) आहे.
डिस्प्ले : 6.67-इंच OLED डिस्प्ले (1.5K रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, 1920Hz PWM डिमिंग, 3200 निट्स पीक ब्राइटनेस). Gorilla Glass 7i प्रोटेक्शन.
मेमरी : LPDDR5X RAM, UFS 4.0 स्टोरेज (12GB/16GB RAM आणि 256GB/512GB स्टोरेज).
कॅमेरा : 50MP Sony LTY-600 OIS मेन कॅमेरा, 8MP Ultra-Wide लेन्स, 20MP OV20B सेल्फी कॅमेरा.
बॅटरी : 6,550mAh Carbon-Silicon Battery, -35°C तापमानातही ड्युरेबल. 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट.