20,000 रुपयांच्या रेंजमध्ये नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Oppo F27 5G हा एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो. विशेष म्हणजे, Amazon Great Indian Festival Sale दरम्यान या फोनवर भरघोस सवलत आणि आकर्षक ऑफर मिळत आहेत. 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत Amazon वर 20,999 रुपये आहे.
मात्र, सेलमध्ये तुम्ही हा फोन 2099 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह खरेदी करू शकता. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला SBI किंवा ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट करावे लागेल.
याशिवाय, तुम्हाला या फोनवर सुमारे 1050 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळण्याची संधी आहे. एक्सचेंज ऑफरचा फायदा घेतल्यास फोनची किंमत 19,949 रुपये पर्यंत कमी होऊ शकते. मात्र, एक्सचेंजवर मिळणारी सवलत तुम्ही देत असलेल्या जुना फोनच्या स्थिती, ब्रँड आणि एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असेल.
Oppo चा हा फोन 32MP सेल्फी कॅमेरा, SGS आणि मिलिटरी-ग्रेड सर्टिफाइड बॉडीसह येतो. चला, आता या फोनचे सर्व फीचर्स जाणून घेऊया.
Oppo F27 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Oppo F27 5G मध्ये कंपनीने 1080×2400 पिक्सल रिझोल्यूशनसह 6.67-इंचाचा HD+ OLED डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 2100 nits च्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज दिले आहे. प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 चिपसेट मिळतो.
कॅमेरा
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी यामध्ये 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
बॅटरी आणि चार्जिंग
फोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
ऑपरेटिंग सिस्टम
हा फोन Android 14 वर आधारित ColorOS वर काम करतो.