जर तुम्ही स्वस्त आणि नवीन 5G स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर Motorola Edge 50 Neo वर दिली जाणारी ही डील तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. सध्या या स्मार्टफोनवर 4,000 रुपयांपर्यंत सवलत दिली जात आहे.
याशिवाय, नो-कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफर सारखे फायदे देखील उपलब्ध आहेत, ज्यामुळे फोन खरेदी करणे आणखी सोपे होते. चला, Motorola Edge 50 Neo ची नवीन किंमत, ऑफर्स, स्पेसिफिकेशन्स आणि विक्री प्लॅटफॉर्मबाबतची माहिती जाणून घेऊया.
Motorola Edge 50 Neo चे फीचर्स
डिस्प्ले: या स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा 1.5K (2670 x 1220 पिक्सल रिझोल्यूशन) pOLED डिस्प्ले आहे. यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 3,000 निट्स पीक ब्राइटनेस आणि गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन देण्यात आले आहे.
प्रोसेसर आणि स्टोरेज: Motorola Edge 50 Neo मध्ये Mediatek Dimensity 7300 चिपसेट, 12GB LPDDR4x RAM आणि 512GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आले आहे.
कॅमेरा: फोनमध्ये रियरला 50MP प्रायमरी कॅमेरा (OIS सह), 13MP अल्ट्रा-वाइड/मॅक्रो कॅमेरा, 3x ऑप्टिकल झूमसह 10MP टेलीफोटो लेन्स दिला आहे. फ्रंटसाठी 32MP कॅमेरा आहे.
बॅटरी आणि चार्जिंग: Motorola Edge 50 Neo मध्ये 4,310mAh बॅटरीसह 68W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग सुविधा आहे.
इतर फीचर्स: IP68 रेटिंगसह वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ, MIL-STD 810H सर्टिफिकेशन, डॉल्बी एटमॉससह ड्युअल स्पीकर, NFC, USB Type-C पोर्ट, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर यांसारख्या सुविधांचा समावेश आहे.
सॉफ्टवेअर: हा फोन Android 14 आधारित Hello UI वर चालतो.
किंमत आणि ऑफर्स
Motorola Edge 50 Neo च्या किंमतीत 3,000 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट आणि 1,000 रुपयांचा बँक ऑफरचा लाभ मिळतो. म्हणजेच, 4,000 रुपयांची सवलत.
- नवीन किंमत: 19,999 रुपये (लॉन्च किंमत: 23,999 रुपये)
- बँक ऑफर: अॅक्सिस आणि IDFC बँकेच्या नॉन-EMI व्यवहारांवर लागू.
- फ्लिपकार्ट अॅक्सिस क्रेडिट कार्ड वापरल्यास 5% कॅशबॅक मिळतो.
- एक्सचेंज ऑफर: जुन्या फोनच्या बदल्यात 13,900 रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतो (फोनच्या स्थितीनुसार).
Motorola Edge 50 Neo Nautical Blue, Latte, Grisel, आणि Poinciana अशा चार रंगांमध्ये 8GB + 256GB स्टोरेजसह उपलब्ध आहे.
कुठून खरेदी कराल?
Motorola Edge 50 Neo फ्लिपकार्टवर ऑनलाइन उपलब्ध आहे. याशिवाय, तो ऑफलाइन स्टोअर्स आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरही खरेदी करता येईल. मात्र, इतर प्लॅटफॉर्मवरील किंमती आणि ऑफर्स वेगळ्या असू शकतात.