iPhone 15 Pro Max Price Cut: iPhone 16 च्या लॉन्चनंतर Apple ने आपल्या iPhone 15 Pro Max या पॉप्युलर मॉडेलचे उत्पादन बंद केले आहे. तरीसुद्धा हा स्मार्टफोन अजूनही ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध आहे. Amazon वर iPhone 15 Pro Max खूपच कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे.
सध्या हा फोन 40 हजार रुपयांहून अधिक डिस्काउंटसह उपलब्ध आहे. Apple चा हा स्मार्टफोन एक उच्च-परफॉर्मन्स आणि पॉवरफुल डिव्हाइस मानला जातो. जर तुम्ही हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या ऑफरची सविस्तर माहिती जाणून घ्या.
iPhone 15 Pro Max साठी Amazon वर उपलब्ध डिस्काउंट
iPhone 15 Pro Max आता स्वस्तात खरेदी करण्याचा सुवर्णसंधी आहे. Amazon वर या फोनसाठी जोरदार डील सुरू आहे. Apple च्या या पावरहाऊस स्मार्टफोनची ओरिजनल किंमत ₹1,59,900 आहे. मात्र, सध्या हा फोन ₹1,15,900 किमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे, म्हणजेच ₹44,000 पर्यंत सूट दिली जात आहे. या ऑफरमध्ये फोनवर 25% पर्यंत डिस्काउंट दिला जात आहे.
Amazon ची ऑफर यावरच थांबत नाही. जर तुम्हाला हा फोन आणखी कमी किमतीत खरेदी करायचा असेल, तर एक्सचेंज ऑफर चा लाभ घेता येईल. या ऑफरमध्ये जुन्या फोनच्या एक्सचेंजवर ₹37,600 पर्यंत अतिरिक्त सूट मिळू शकते. मात्र, एक्सचेंजवर मिळणारी सूट तुमच्या जुन्या फोनची स्थिती आणि वयावर अवलंबून असते. अशा प्रकारे तुम्ही हा प्रीमियम फोन अत्यंत परवडणाऱ्या किंमतीत खरेदी करू शकता.
iPhone 15 Pro Max चे स्पेसिफिकेशन्स
iPhone 15 Pro Max मध्ये 6.7 इंचाचा Super Retina XDR OLED डिस्प्ले दिला आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि Dolby Vision सपोर्ट आहे. त्यामुळे युजर्सना उत्कृष्ट कंटेंट व्यूइंग अनुभव मिळतो. फोनमध्ये 2000 निट्सची पीक ब्राइटनेस दिली आहे.
हा स्मार्टफोन IP68 रेटिंगसह येतो, त्यामुळे तो पाण्यापासून सुरक्षित राहतो. यामध्ये टफ सिरेमिक शील्ड फ्रंटला वापरण्यात आले आहे, तर फ्रेम टायटॅनियम ची आहे. यामुळे फोन हलका असून मजबूत बनतो. कॅमेरा सेटअपमध्ये 48MP + 12MP + 12MP ट्रिपल रियर कॅमेरे आहेत आणि सेल्फीसाठी 12MP कॅमेरा दिला आहे. हा स्मार्टफोन iOS 17 वर काम करतो.