मेटा (Meta) ने TikTok क्रिएटर्ससाठी मोठी ऑफर आणली आहे. बिझनेस इनसाइडर (Business Insider) च्या अहवालानुसार, मेटा अशा TikTok क्रिएटर्सना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यांचे 1 मिलियन (10 लाख) पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. या क्रिएटर्सना मेटा शॉर्ट फॉर्म व्हिडिओ बनवण्यासाठी $2500 ते $50,000 (अंदाजे ₹2 लाख ते ₹43 लाख) पर्यंत ऑफर करत आहे.
मासिक पेमेंटसाठी क्रिएटर्सने किमान तीन महिने Instagram वर एक्सक्लुझिव्ह शॉर्ट फॉर्म व्हिडिओ क्रिएट आणि शेअर करावे लागतील. मासिक पेंआउट क्रिएटरच्या फॉलोअर्सच्या संख्येवर आणि कंटेंट एंगेजमेंटवर अवलंबून असेल. मेटा आपल्या या रणनीतीद्वारे TikTok ला टक्कर देण्याचा विचार करत आहे.
6 महिन्यांत 2.5 कोटी रुपये कमावण्याची संधी
पैसे कमवण्यासाठी क्रिएटर्सना दर महिन्याला ठरावीक संख्येने Reels पोस्ट कराव्या लागतील. या Reels 15 सेकंद ते 3 मिनिटांपर्यंतच्या असू शकतात. मेटाने अट घातली आहे की क्रिएटर्सने त्यांच्या Reels, TikTok आणि YouTube वरही शेअर कराव्यात, जेणेकरून त्यांच्या फॉलोअर्सना Instagram कडे आकर्षित करता येईल.
अहवालानुसार, Instagram 6 महिन्यांसाठी $3 लाख (अंदाजे ₹2.59 कोटी) ची डील ऑफर करत आहे, ज्यामध्ये क्रिएटर्सने दर महिन्याला किमान 10 Reels पोस्ट करणे आवश्यक असेल.
दररोज एकदा फॅन्ससोबत संवाद आवश्यक
प्रारंभी क्रिएटर्सना दर महिन्याला $50,000 पर्यंत कमावण्याची संधी मिळेल. तसेच, जास्त एंगेजमेंट आणि फॉलोअर्स असलेल्या क्रिएटर्सना अधिक पेंआउट मिळण्याची संधी असेल. यामध्ये 6 महिन्यांत एकूण $3 लाख कमावण्याचा देखील पर्याय उपलब्ध असेल.
मात्र, यासाठी क्रिएटर्सना त्यांच्या मागील शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ प्लॅटफॉर्मच्या तुलनेत 25% अधिक Instagram Reels पोस्ट कराव्या लागतील. याशिवाय, दररोज एकदा फॅन्ससोबत कमेंट्स, शेअर्स आणि रिप्लायच्या माध्यमातून संवाद साधावा लागेल.
काही क्रिएटर्स संभ्रमात
आकर्षक पेमेंट ऑफर असूनही काही क्रिएटर्स संभ्रमात आहेत. Instagram ची एक्सक्लुझिव्ह कंटेंट डिमांड आणि इतर प्लॅटफॉर्मच्या तुलनेत अधिक कंटेंट तयार करण्याची गरज यावर काही लोकांनी चिंता व्यक्त केली आहे.
क्रिएटर्सना मॅनेज करणाऱ्या टॅलेंट मॅनेजर्सच्या मते, Instagram च्या एक्सक्लुझिव्ह अटी आणि सर्व प्लॅटफॉर्मवर कंटेंट क्रिएशन संतुलित करण्याची अट यामुळे काही लोकांसाठी मेटाचे हे ऑफर कमी आकर्षक ठरत आहे.