प्रीमियम वियरेबल ब्रँड Garmin ने भारतीय बाजारात अनेक फिटनेस वियरेबल्स ऑफर केले असून, आता Fenix 8 Series या रेंजचा भाग बनली आहे. या नवीन स्मार्टवॉच रेंजमध्ये दोन व्हेरिएंट्स आहेत—एकात AMOLED डिस्प्ले आणि दुसऱ्यात सोलर-चार्जिंग सपोर्ट दिला आहे. या Fenix 8 सीरिजमध्ये मल्टी-स्पोर्ट सपोर्ट देण्यात आला असून, विविध ॲक्टिव्हिटीजदरम्यान याचा सहज वापर करता येतो.
Designed for fitness enthusiasts with advanced features
हे वियरेबल्स विशेषतः फिटनेस लव्हर्ससाठी डिझाइन करण्यात आले आहेत. ट्रेनिंग स्टेटस, VO2 Max आणि इतर हेल्थ इनसाइट्स सहज ट्रॅक करता येतात. या घड्याळात अॅडव्हान्स स्ट्रेंथ ट्रेनिंग फीचर्स आहेत आणि 40 मीटरपर्यंतच्या पाण्याखाली डाईव्हिंगसाठीही सपोर्ट करते. यामध्ये बिल्ट-इन स्पीकर आणि मायक्रोफोन आहेत, ज्यामुळे व्हॉइस कमांड्स आणि व्हॉईट नोट फीचर्स देखील उपलब्ध आहेत.
Battery life up to 48 days
नवीन AMOLED मॉडेलमध्ये 51mm डिस्प्ले दिला आहे, ज्यामुळे स्मार्टवॉच मोडमध्ये 29 दिवसांपर्यंत बॅटरी टिकते. दुसऱ्या सोलर चार्जिंग मॉडेलमध्ये 48 दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ दिली जाते. हे वियरेबल्स तीन वेगवेगळ्या साइजमध्ये लाँच करण्यात आले आहेत – 43mm, 47mm आणि 51mm. यामध्ये प्रगत मॅपिंग आणि नेव्हिगेशन फीचर्स दिले असून, हे फीचर्स लाँग-इंड्युरन्स ॲक्टिव्हिटीजसाठी उपयुक्त आहेत. यामध्ये Garmin Messenger App सोबत टू-वे मेसेजिंगचे फिचर दिले आहे.
Rugged design with leak-proof buttons
ही स्मार्टवॉच प्रेमियम रग्ड डिझाइनसह येते, ज्यामध्ये लीक-प्रूफ मेटल बटन्स दिले आहेत. यामध्ये नवीन सेन्सर गार्डसोबत बिल्ट-इन LED फ्लॅशलाइट मिळते. ही घड्याळे तापमानातील बदल किंवा शॉकमुळे प्रभावित होत नाहीत आणि यामध्ये वॉटर रेसिस्टंस देखील आहे. हे वियरेबल्स मिलिटरी-ग्रेड बिल्डसह आले असून, अनेक हेल्थ ट्रॅकिंग फीचर्स दिले आहेत.
Availability and pricing
Garmin चे हे वियरेबल्स कंपनीच्या वेबसाइटवर तसेच निवडक प्रीमियम रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहेत. अधिकृत वितरकांमार्फतही ही घड्याळे खरेदी करता येतील. Garmin Fenix 8 Series ची प्रारंभिक किंमत ₹86,990 ठेवण्यात आली असून, यावर 2 वर्षांची वॉरंटी दिली जाते.