भारतात उपलब्ध असलेल्या सर्व OTT सेवांमध्ये Netflix चे सब्सक्रिप्शन सर्वाधिक महाग आहे. मात्र, प्रमुख टेलिकॉम कंपन्या अशा काही प्रीपेड प्लान्स ऑफर करत आहेत, ज्यामुळे रिचार्ज केल्यास तुम्हाला या OTT प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन फ्री मध्ये मिळते. तुम्ही तुमच्या नंबरवर रिचार्ज करणारच आहात, त्यामुळे Free Netflix चा देखील फायदा घ्या. कोणते प्लान्स उपलब्ध आहेत ते खाली पाहा.
Jio चा ₹1299 प्लान
Reliance Jio च्या ₹1299 रिचार्ज प्लानमध्ये 84 दिवसांची वैधता मिळते. यामध्ये रोज 2GB डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि 100 SMS प्रति दिवस पाठवण्याचा पर्याय दिला जातो. याशिवाय, जिओ अॅप्सचा अॅक्सेस मिळतो आणि Netflix (Mobile) सब्सक्रिप्शन या कालावधीसाठी विनामूल्य दिले जाते.
Jio चा ₹1799 प्लान
ज्यांना रोज 3GB डेटा आवश्यक आहे, त्यांनी हा प्लान निवडू शकतात. यामध्ये 84 दिवसांची वैधता, दररोज 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंग दिले जाते. यासोबत जिओ अॅप्सचा अॅक्सेस आणि Netflix (Basic) सब्सक्रिप्शन देखील मिळते. हे दोन्ही जिओ प्लान्स पात्र ग्राहकांसाठी अनलिमिटेड 5G डेटा देतात.
Airtel चा ₹1798 प्लान
Airtel ग्राहकांना Free Netflix मिळवण्यासाठी या एकमेव प्लानचा पर्याय दिला जातो. या प्लानमध्ये 84 दिवसांची वैधता, रोज 3GB डेटा, 100 SMS प्रति दिवस, आणि सर्व नेटवर्क्सवर फ्री कॉलिंग मिळते.
याशिवाय, Netflix (Basic) सब्सक्रिप्शन, Airtel Xstream आणि Apollo 24/7 अॅक्सेस देखील या प्लानमध्ये मिळतो. पात्र ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटा दिला जातो.
Vodafone Idea (Vi) चा ₹1198 प्लान
Vi ग्राहकांना ₹1198 च्या प्लानवर 70 दिवसांची वैधता मिळते. यामध्ये रोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, आणि 100 SMS प्रति दिवस मिळतात. यासोबत रात्री अनलिमिटेड डेटा, वीकेंड डेटा रोलओव्हर, डेटा डिलाइट्स यासारखे फायदे मिळतात. तसेच, Netflix (Basic) सब्सक्रिप्शन देखील या प्लानमध्ये समाविष्ट आहे.