Connect with us

पाय दुखण्यामुळे आणि चमक येण्यामुळे हैराण झाले, तर करा हे 6 घरगुती उपाय

Health

पाय दुखण्यामुळे आणि चमक येण्यामुळे हैराण झाले, तर करा हे 6 घरगुती उपाय

पाय दुखणे आणि चमक येणे ही सामान्य समस्या आहे. याचे सर्वात मोठे कारण मसल्सला आराम न मिळणे. व्यस्त आणि धावपळीच्या आयुष्यात अश्या समस्या सामान्य झालेल्या आहे. हि समस्या बोटांमध्ये, टाचेत, पिंडरी किंवा संपूर्ण पाय कोठेही होऊ शकते. असे मानले जाते कि काही घरगुती उपाय यावर अत्यंत फायदेशीर आहेत. अनेक वेळा लोक पाय दुखत असल्यास पेन किलर खातात. परंतु घरगुती उपाय केल्याने वेदना कमी होण्यास मदत होऊ शकते. चला तर आज आपण पाहू कोणते घरगुती उपाय पाय दुखत असल्यास उपयोगी होऊ शकतात.

वर सांगितल्या प्रमाणे मसल्स थकल्यामुळे पाय दुखतात. मसल्स थकण्याची अनेक कारणे असू शकतात. जसे जास्त चालणे, कामाचा जास्त त्रास, गुडघे, हिप्स आणि पायात योग्य ब्लड सर्कुलेशन न होणे. त्याच सोबत खाण्या पिण्यात दुर्लक्ष केल्याने पायात वेदना होऊ शकतात. ज्यामध्ये पाणी कमी पिणे, योग्य आहार न घेणे, कैल्शियम, पोटेन्शियम सारखे मिनरल्स आहारात योग्य प्रमाणात नसणे. तसेच विटामिनची कमी असल्याने देखील पाय दुखू शकतात.

पायदुखीवर घरगुती उपाय

सेंधव मीठ हे घरामध्ये उपलब्ध असलेले एक औषध आहे. जे तुम्हाला पायाच्या दुखण्यात आराम देऊ शकते. पाण्यात थोडे सेंधव मीठ टाकून पाय त्यामध्ये ठेवा. यामुळे तुमचे ब्लड सर्कुलेशन सुधारेल आणि पायाच्या वेदना कमी होतील.

गरम आणि थंड पाण्याने पायांना शेक करा यामुळे पायाच्या वेदनेत कमतरता येईल. गरम पाणी रक्तसंचार व्यवस्थित करण्यास मदत करतो. तर थंड पाणी तुमच्या पायाची सूज कमी करण्यास मदत करतो.

राई (महुरी)चा वापर रक्तसंचार सुधारण्यासाठी आणि शरीरातील विशाक्त पदार्थ दूर करण्यासाठी केला जातो. राई पायाच्या वेदना कमी करण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी देखील वापरली जाते. काही राईचे दाणे घ्या आणि त्यांना गरम पाण्यात टाका आणि पायांना जवळपास वीस मिनिटे या मध्ये बुडवून ठेवा. यामुळे पाय दुखण्यात आराम मिळेल.

लवंग तेल हे डोकेदुखी, सांधेदुखी, नेल फंगस आणि पाय दुखण्यावर फायदेशीर आहे. पायाच्या दुखण्यापासून त्वरित आराम मिळवण्यासाठी लवंग तेलाने हळूहळू मालिश करा कारण मालिश केल्यामुळे रक्त प्रभाव उत्तेजित होतो.

केळे हे एक असे फळ आहे जे आपल्या शरीरातील पोटेशियम लेवलला वाढवते. जर तुम्ही दररोज केळे सेवन केले तर यामुळे शरीरातील कैल्शियम आणि पोटेशियमचे प्रमाण वाढेल. सांधेदुखी आणि पाय दुखणे हे कैल्शियम आणि पोटेशियमच्या कमी मुळे होते.

हळद एक अशी औषधी आहे जी तुम्हाला सर्व वेदने पासून दूर ठेवते. यासाठी तुम्हाला हळदीची एक पेस्ट बनवून आपल्या पायावर लावावी लागेल. जर तुम्ही असे आठवड्यातून दोन ते तीन वेळा केले तर पाय दुखणे बंद होऊ शकते.

पाय दुखू नयेत यासाठी नियमित व्यायाम करा, वार्म अप करा आणि आपल्या शारीरिक गतीविधीकडे लक्ष द्या. शरीरात पाण्याची कमी होऊ देऊ नका.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top