health

अन्न सहज पचन होत नाही तर या वस्तूंचे करा सेवन,दुरुस्त होईल पचनक्रिया

वेळे अनुसार आपली लाइफस्टाइल पण बदलली आहे, अनेक बाबतीत हा बदल योग्य आहे पण आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर आधुनिक जीवनशैली आपल्या आरोग्यावर भरपूर प्रभाव टाकते. आजकालची अनियमित दिनचर्या आणि खाणेपिणे याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळे अनेक शारीरिक समस्या उद्भवतात. विशेषतः पोटाशी संबंधित समस्या होतात. जंकफूड आणि बाहेरील खाणे यामुळे पोटामध्ये गैस, अपचन आणि बद्धकोष्ठता यांचा जन्म होतो. तर अश्या पोटाच्या समस्या इतर दुसऱ्या आजारांचे कारण बनतात. यासाठी यांच्या पासून सुटका मिळवणे आवश्यक आहे.

 

आज आम्ही तुम्हाला पोटाच्या अश्याच समस्यांच्यावर उपाय सांगत आहोत. खरतर आपण आपल्या खानेपिण्या मध्ये काही आवश्यक बदल केले तर भरपूर प्रमाणात पोटाच्या समस्ये पासून सुटका मिळवली जाऊ शकते. यासाठी तुमच्या डाइट मध्ये काही बदल करावे लागतील. तुम्हाला काही खाद्यपदार्थ शामिल करावे लागतील जे तुमची पाचाक्रिया मजबूत करतील. चला तर पाहू या कोणते आहेत ते खाद्यपदार्थ…

दही

दही पोटासाठी रामबाण आहे, खरतर यामध्ये चांगले बैक्तीरीया असतात, जे पोटाच्या समस्ये मध्ये आराम मिळवून देतात. यासाठी जर तुम्हाला एसिडीटी, अपचन किंवा पोटाची समस्या असेल तर आपल्या डाइट मध्ये जास्तीत जास्त दही शामिल करा. बद्धकोष्ठ समस्येमध्ये दह्या मध्ये ओवा (अजवायन) मिक्स करून खावे.

केळे

केळे जेथे वजन वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते तेथेच ते पोटासाठी देखील फायदेशीर ठरते. म्हणून पोटामध्ये इन्फेक्शन झाल्यास केळी खाण्याचा सल्ला दिला जातो.

पपई

पपई खाल्ल्या नंतर 24 तासाच्या आत पचनक्रिया दुरुस्त होते, खरतर यामध्ये पपेन नावाचे एन्जाइम असते जे प्रोटीन तोडून त्यास पचन करण्यास योग्य बनवते. त्यामुळे तुम्ही जर काहीही खात असाल जे पचन होत नसेल, तर पपई खाऊन आपल्या पचनक्रियेला मदत करावी.

नाशपाती

नाशपाती सेवन करणे पोटासाठी फायदेशीर असते. यामध्ये भरपूर प्रमाणात फाईबर असते. ज्यामुळे पचनक्रिया दुरुस्त होते..

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यामध्ये भरपूर आयरन आणि विटामिनस असतात. यामुळे पचन सोप्पे होते.


Show More

Related Articles

Back to top button