money

तुमच्या डेबिट कार्ड वर EMI मिळेल का नाही… चेक करण्यासाठी DCEMI लिहून या नंबर वर सेंड करा

ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट ने हल्लीच कस्टमर्ससाठी डेबिट कार्डवर EMI ची सुविधा सुरु केली आहे. त्यामुळे आता अमेझॉनने देखील ही सेवा सुरु केली आहे. म्हणजेच आता कस्टमर्स कोणताही प्रोडक्ट डेबिट कार्डच्या मदतीने EMI वर खरेदी करू शकतात. अगोदर ही सुविधा फक्त क्रेडीट कार्डवर दिली जात होती.

सर्व ग्राहकांना नाही मिळणार ही सुविधा

फ्लिपकार्ट आणि अमेझॉन कडून दिली जाणारी ही EMI ची सुविधा सर्व युजर्सना मिळणार नाही. जर तुम्ही फ्लिपकार्ट कडून EMI वर प्रोडक्ट डेबिट कार्ड वापरून खरेदी करणार असाल तर तुमचे अकाऊंट AXIS बैंक, ICICI बैंक आणि SBI बैंक मध्ये असले पाहिजे. तर अमेझॉनसाठी ICICI बैंक आणि HDFC बैंक कडे असले पाहिजे. या बैंक व्यतिरिक्त दुसऱ्या बैंकेच्या डेबिट कार्डवर ही सुविधा नाही मिळणार.

असे चेक करा तुम्हाला सुविधा मिळणार आहे का नाही

Flipkart आणि Amazon कडून मिळणारी डेबिट कार्डवर EMI सर्विसचा फायदा तुमच्या डेबिट कार्डवर मिळणार का नाही हे पाहण्यासाठी आपल्या बैंक मध्ये अपडेट असलेल्या नंबरने एक SMS करावा लागेल. DCEMI मेसेज मध्ये लिहून हा मेसेज 57575 वर सेंड करा. जर तुमच्या डेबिट कार्डवर ही सुविधा असेल तर तुम्हाला कॉन्ग्रेचुलेशन असा SMS येईल.

अमेझॉन वरून EMI साठी ICICI डेबिट कार्ड मिनिमम 8000 रुपयेची शॉपिंग करावी लागेल.

अमेझॉन वरून EMI साठी HDFC डेबिट कार्ड मिनिमम 10000 रुपयेची शॉपिंग करावी लागेल.

फ्लिपकार्ट ने यासाठी कोणतीही मिनिमम लिमिटेशन ठरवली नाही आहे. जीरो बैलेंस असले तरी देखील शॉपिंग करू शकता.

 


Show More

Related Articles

Back to top button